Home | Sports | Other Sports | 350 crore people watched the World Cup, earning 41 thousand crores of FIFA

FIFA WORLD CUP : 350 कोटी लोक पाहतील वर्ल्ड कप, फिफाची 41 हजार कोटींची कमाई

दिव्य मराठी | Update - Jun 14, 2018, 07:41 AM IST

फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा फिफा वर्ल्ड कप गुरुवारपासून सुरू होत आहे. ३२ दिवसांत ३२ संघांत ६४ सामने होतील. रात्री ८.३०

 • 350 crore people watched the World Cup, earning 41 thousand crores of FIFA

  मॉस्को - फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा फिफा वर्ल्ड कप गुरुवारपासून सुरू होत आहे. ३२ दिवसांत ३२ संघांत ६४ सामने होतील. रात्री ८.३० वाजता रशिया विरुद्ध सौदी अरेबियाच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल. त्याअगोदर सायंकाळी ६.३० वाजता उद््घाटन समारंभ पार पडेल. ब्रिटनचा पॉप स्टार रॉबी विल्यम्स, अमेरिकन कलाकार विल स्मिथचे सादरीकरण होईल. ३.५ अब्ज लोक स्पर्धा पाहतील. १५ जुलैला फायनल होईल.

  वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा

  - पनामा-आइसलँड पहिल्यांदा खेळणार : आइसलँड (३.४० लाख) सर्वात कमी लोकसंख्येचा देश स्पर्धेत खेळेल.
  - फुटबॉलमध्ये चिप : चिप लावलेल्या टेलस्टार-१८ फुटबॉलने खेळता येईल. चिपमुळे स्मार्टफोन कनेक्ट होईल.
  - ओपनिंग सामन्यात "बॉल गर्ल': १४ मुली "बॉल गर्ल' असतील. भारताकडून रिषी, नथानिया जॉन बॉल कॅरिअर.
  - व्हीएआर तंत्रज्ञान : व्हीएआर म्हणजे व्हिडिओ असिस्टंट रेफरी तंत्रज्ञानाचा वापर. रेफ्रीचा निर्णय पडताळला जाईल.

  एकही सामना न जिंकणाऱ्या संघालाही मिळतील ५४ कोटी रुपये

  - 2705 कोटींची बक्षीस रक्कम फिफा देणार वर्ल्ड कप मधील 32 संघांना

  - 256 कोटी बक्षीस रक्कम मिळणार वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला

  - 189 कोटी उपविजेत्यांना तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या संघाला 162 कोटी

  प्रथमच एखाद्या वर्ल्ड कपचे दोन सामने दोन वेगवेगळ्या खंडांत खेळवले जातील

  - यजमान शहर कॉलिनग्रेड, मॉस्को, सोच्ची हे यूरोप, तर एकतेरिनबर्ग आशियात अाहे.
  - कॉलिनग्रेड- एकतेरिनबर्ग हे अंतर 3051 किमी आहे. तेे मॉस्को ते लंडन इतके आहे.

  अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाला मिळाला 2026 वर्ल्ड कप आयोजनाचा मान

  २०२६ मध्ये २३ व्या फिफा वर्ल्ड कप आयोजनाचा मान अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाला मिळेल. फिफा काँग्रेसमध्ये तिन्ही देशांच्या प्रस्तावाला १३४ मते मिळाली. मोरोक्कोला ६५ मते मिळाली. या वर्ल्ड कपमध्ये ४० संघ ८० सामने खेळणार आहेत.

  स्पेनचा प्रशिक्षक बडतर्फ, रिअल माद्रिदचा व्यवस्थापक झाल्याने कारवाई
  स्पेनने वर्ल्ड कपच्या एक दिवस आधी प्रशिक्षक जुलेनला बडतर्फ केले. जुलेनच्या मार्गदर्शनाखाली स्पेन एकही सामना हरला नाही. त्यांचा २०२० पर्यंत करार होता. त्यांनी पुढील हंगामासाठी रिअल माद्रिदशी करार केला आहे.

Trending