आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • According To The New Rules Of The AISSF, The World Cup Will Be Played From March 1

अायएसएसएफच्या नवीन नियमानुसार 1 मार्चपासून नेमबाजी वर्ल्डकप रंगणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- येत्या १ मार्चपासून यंदाच्या वर्षातील पहिल्या नेमबाजी विश्वचषकाला सुरुवात हाेत अाहे. हा वर्ल्डकप यंदा मेक्सिकाेमध्ये अायाेजित करण्यात अाला. हा वर्ल्डकप अाता नव्या नियमाच्या अाधारे खेळवला जाईल. त्यामुळे अाता नेमबाजांना कमी वेळेमध्ये अधिक नेम लावावे लागणार अाहेत.  भारताचे ३४ नेमबाज या वर्ल्डकपमध्ये अापले काैशल्य पणास लावणार अाहेत. मात्र, यामध्ये हिना सिद्धूचा समावेश नाही. तिने यातून माघार घेतली. 


अांतरराष्ट्रीय नेमबाजी स्पाेर्टस फेडरेशनने (अायएसएसएफ) नेमबाजीमध्ये अाता मिश्र इव्हेंट सहभागी झाल्यानंतर काही बदल केले अाहेत. नव्या नियमांना नेमबाजीमध्ये जेंडर इक्वलिटीही म्हटले जाऊ लागले. यानंतर अाता महिला व पुरुष काेणत्याही इव्हेंटमध्ये बराेबरीच्या संख्येत नेमबाजी करू शकतील, असा नियम असेल. 

 

२५ मी. पिस्तूल, ६० शाॅट सक्तीचे 

- नव्या नियमाने अाता १० मी. एअर पिस्तूल व १० मी. एअर रायफल, २५ मी. पिस्तूलमध्ये महिलांना ४० च्या एेवजी ६० शाॅट मारावे लागणार अाहेत. हा नव्याने बदल या ठिकाणी करण्यात अाला. 

 

मिश्रमध्ये ५० मिनिटांत ४० शाॅट

- १० मी. एअर पिस्तूल व एअर रायफल मिश्रमध्ये ५० मिनिटांच्या पात्रता फेरीत प्रत्येकी ४० शाॅट असतील. 
- पहिल्यानंतर  दुसऱ्या नेमबाजाला नेम धरावा लागेल. निर्धारित वेळेनंतर पेनाल्टी लागेल. 

बातम्या आणखी आहेत...