आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA: फ्रान्सची 12 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक; वर्ल्डकपमध्ये प्रथमच उरुग्वेला केले पराभूत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निज्नी नाेवागाेंद्र- माजी चॅम्पियन फ्रान्स अाणि बेल्जियम संघाने शुक्रवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. फ्रान्सने पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये दाेन वेळच्या विजेत्या उरुग्वेचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने २-० अशा फरकाने सामना जिंकला. वार्ने (४० वा मि.) अाणि ग्रिजमॅन (६१ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून संघाला राेमहर्षक विजय मिळवून दिला. या दाेघांची सामन्यातील कामगिरी वाखाणण्याजाेगी ठरली. त्यामुळे टीमला एकतर्फी विजय नाेंदवता अाला. 


या धडाकेबाज विजयाच्या बळावर फ्रान्स संघाने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. बचावात्मक खेळीत अपयशी ठरलेल्या सुअारेझच्या उरुग्वेला पॅकअप करावे लागले. या टीमला शेवटपर्यंत सामन्यात एकही गाेल करता अाला नाही. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. 


फ्रान्स ठरला पहिला संघ 
यंदाच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा फ्रान्स हा पहिला संघ ठरला. या टीमची अंतिम अाठमधील कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे या संघाला हा पल्ला यशस्वीपणे गाठता अाला. अाता फ्रान्सचा संघ अंतिम फेरीतील प्रवेशासाठी ११ जुलै राेजी उपांत्य सामन्यात मैदानावर उतरणार अाहे. 


५ वेळच्या चॅम्पियन ब्राझीलचा पराभव; बेल्जियम उपांत्य फेरीत 
पाच वेळच्या चॅम्पियन ब्राझील संघावर शुक्रवारी वर्ल्डकपमधून पॅकअप करण्याची नामुष्की अाेढावली अाहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीतच्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलचा पराभव केला. बेल्जियमने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. ब्रुने (३१ वा मि.) याने गाेल करून बेल्जियमला विजय मिळवून दिला. तसेच या टीमच्या विजयात ब्राझीलच्या फेडिरीन्हाेने एका गाेलचे याेगदान दिले. त्याने १३ व्या मिनिटाला अात्मघाती गाेल केला. त्यामुळेच ब्राझीलसाठी हा घातक ठरला. या गाेलच्या अाधारे बेल्जियमने अापला दबदबा निर्माण केला. त्यानंतर हीच लय कायम ठेवताना बेल्जियमने ३१ व्या मिनिटाला अाघाडीला मजबुत केला. ब्रुनेने शानदार गाेल केला. यासह बेल्जियमला पहिल्या हाफमध्येच एकतर्फी विजय निश्चित करता अाला. 


बेल्जियम सलग चाैथ्यांदा उपांत्य फेरीत
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियमने सलग चाैथ्यांदा अाणि एकूण १२ व्यांदा वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली अाहे. यासह अाता बेल्जियमने किताबाचा अापला दावाही मजबुत केला. 


अाता फ्रान्सचे अाव्हान
अाता उपांत्य सामन्यात बेल्जियमसमाेर १९९८ च्या विश्वविजेत्या फ्रान्स संघाचे अाव्हान असेल. हे दाेन्ही संघ उपांत्य सामन्यात झुंज देतील. फ्रान्सने उरुग्वेला नमवून ही फेरी गाठली. 


यजमान रशियाची २८ वर्षांपासून अंतिम अाठमध्ये विजयी माेहीम 
साेच्ची |
यजमान रशिया संघ उपांत्यपूर्व फेरीतील अापली विजयी माेहीम अबाधित ठेवण्यासाठी उत्सुक अाहे. कारण, या टीमला मागील २८ वर्षांपासून ही माेहीम कायम ठेवता अाली अाहे. त्यामुळे अाता पुन्हा या सामन्यात विजयाचा कित्ता गिरवण्याचा यजमान रशियाचा प्रयत्न असेल. चाैथ्या उपांत्यपूर्व सामन्यात रशियासमाेर क्राेएशियाचे अाव्हान असेल. साेच्चीच्या मैदानावर हे दाेन्ही संघ अापले नशीब अाजमावतील. 


स्वतंत्र रशिया म्हणून यजमानांनी यंदा पहिल्यांदाच वर्ल्डकपची उपांत्यपूर्व फेरी गाठली अाहे. त्यामुळे टीमला अाता अंतिम चारमधील प्रवेशाचाही विश्वास अाहे. साेव्हिएत रशियाच्या भूमिकेत या टीमची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

बातम्या आणखी आहेत...