Home | Sports | Other Sports | Ankit Bavne Selected in India-A Team

अंकितची भारत अ संघात निवड; दुलीपसाठी फजलकडे नेतृत्व

वृत्तसंस्था | Update - Jul 24, 2018, 09:08 AM IST

विदर्भ संघाला रणजीचा किताब मिळवून देणारा कर्णधार फैज फझल अाता दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत नेतृत्व करणार अाहे.

 • Ankit Bavne Selected in India-A Team

  नवी दिल्ली- विदर्भ संघाला रणजीचा किताब मिळवून देणारा कर्णधार फैज फझल अाता दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत नेतृत्व करणार अाहे. त्याच्याकडे इंडिया ब्ल्यू संघाच्या कर्णधारपदाची जवाबदारी साेपवण्यात अाली. या स्पर्धेत भारताच्या ब्ल्यू, रेड अाणि ग्रीन संघाची साेमवारी घाेषणा झाली. तसेच दक्षिण अाफ्रिका अ संघाविरुद्ध दाेन चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अाैरंगाबादच्या गुणवंत खेळाडू अंकित बावणेची निवड झाली. ताे ४ अाॅगस्टपासून या मालिकेत यजमान भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणार अाहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघ जाहीर केला. या संघात नागपूरच्या गुरबानीचा समावेश अाहे. हे दाेघेही या संघात श्रेयसच्या नेतृत्वात खेळतील.


  फजल, मुकुंद अाणि पार्थिवकडे नेतृत्व

  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने यंदाच्या सत्रातील दुलीप ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेसाठी संघांची घाेषणा केली. यासाठी विदर्भाला रणजी ट्राॅफी मिळवून देणाऱ्या कर्णधार फैज फझलकडे नेतृत्व साेपवण्यात अाले. त्याची दुलीप ट्राॅफीच्या इंडिया ब्ल्यू संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात अाली. तसेच अभिनव मुकुंद हा इंडिया रेड संघाचे नेतृत्व करणार अाहे. तसेच टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज पार्थिव पटेलकडे इंडिया ग्रीन संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली अाहे.

  चाैरंगी मालिकेसाठी संघ निवड
  भारत अ :
  श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शाॅ, रवी कुमार समर्थ, सूर्यकुमार यादव, हनुमा विहारी, नितीश राणा, सिद्धेश लाड, संजू सॅमसन, मयंक मारकंडे, गाेवथाम, कृणाल, दीपक चाहर, सिराज, शिवम मवी, खलील अहमद.
  भारत ब : मनीष पांडे (कर्णधार), मयंक अग्रवाल, ईश्वरन, शुभमान गिल, दीपक हुडा, रिकी भुई, विजय शंकर, ईशान किशन, श्रेयस गाेपाल, जयंत यादव, जडेजा, सिद्धार्थ काैल, प्रसिध कृष्णा, कुलवंत खेजाेरिया, नवदीप सैनी.


  दक्षिण अाफ्रिका अ संघाविरुद्ध चारदिवसीय सामना
  भारत अ संघ :
  श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शाॅ, रवी कुमार समर्थ, अंकित बावणे, मयंक अग्रवाल, अभिमन्यू ईश्वरन, हनुमा विहारी, काेना भारत, अक्षर पटेल, शाहबाज नदीम, यजुवेंद्र चहल, जयंत यादव, रजनीश गुरबानी, नवदीप सैनी, अंकित राजपूत, माेे. सिराज.


  अंकित अाफ्रिकेविरुद्ध खेळणार
  अाैरंगाबादचा प्रतिभावंत खेळाडू अंकित बावणे अाणि नागपूरचा रजनीश गुरबानी हे दाेघेही दक्षिण अाफ्रिका अ संघाविरुद्धच्या मालिकेत खेळणार अाहेत. या दाेघांची भारत अ संघात निवड झाली. या दाेन्ही संघात दाेन चारदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार अाहे. येत्या ४ अाॅगस्टपासून या मालिकेला सुरुवात हाेईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ मालिकेत नशीब अाजमावणार अाहे. बेलगाम अाणि बंगळुरू येथील मैदानांवर या मालिकेतील दाेन सामने हाेतील.


  दुलीप ट्राॅफीसाठी संघांची घाेषणा
  इंडिया ग्रीन :
  पार्थिव पटेल (कर्णधार), प्रशांत चाेप्रा, प्रियांक पांचाळ, सुदीप चटर्जी, गुरकिरत मन, बाबा इंद्रजित, व्ही. साेळंकी, जलज सक्सेना, करण शर्मा, विकास मिश्रा, के. विग्नेश, अंकित राजपूत, अशाेक डिंडा, अतिथ सेथ.

  इंडिया ब्ल्यू : फैज फजल (कर्णधार), अभिषेक रमण, अनमाेलप्रीत सिंग, गणेश सतीश, गंगटा, ध्रुव शाैरी, के. भारत, अक्षय वखरे, साैरवकुमार, स्वप्निल सिंग, बासिल थाम्पी, अयप्पा, जयदेव उनाडकत, धवल कुलकर्णी.
  इंडिया रेड : अभिनव मुंकुद (कर्णधार), अार. संजय, अाशुताेष सिंग, बाबा अपराजित, चटर्जी, बी. संदीप, अभिषेक गुप्ता, नदीम, मिहिर हिरवानी, परवेझ रसूल, गुरबानी, मिथुन, ईशान पाेरल, पृथ्वीराज.

Trending