आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धा; शारापाेवा, सिमाेनाची अागेकूच; मुगुरुझा, वावरिंकाचे पॅकअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- नंबर वन सिमाेना हालेप, माजी नंबर वन मारिया शारापाेवा, नाेवाक याेकाेविकने अापली विजयी माेहीम कायम ठेवताना गुरुवारी अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे विम्बल्डन चॅम्पियन गार्बिने मुगुरुझा अाणि सहाव्या मानंकित स्टॅन वावरिंकाला दुसऱ्याच फेरीत पॅकअप करावे लागले. मुगुरुझाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.

 

दुसऱ्या मानांकित राॅजर फेडररने विजय संपादन करून तिसऱ्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. त्याने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत जे. स्ट्रफचा पराभव केला. त्याने ६-४, ६-४, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला पुढची फेरी गाठता अाली. त्याने तिन्ही सेटवर अाक्रमक खेळी करताना हा विजय साकारला. यासाठी त्याला तिसऱ्या सेटवर शर्थीची झंुज द्यावी लागली. मात्र, ताे यात वरचढ ठरला.   


याेकाेविकचा राेमहर्षक विजय

सहा वेळच्या चॅम्पियन नाेवाक याेकाेविकला दुसऱ्या फेरीतील विजयासाठी शर्थीची झंुज द्यावी लागली. त्याला सामन्यात फ्रान्सच्या गेल माेफिल्सने चांगलेच झंुजवले. मात्र, १४ व्या मानांकित याेकाेविकने अाक्रमक खेळी करताना राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने ४-६, ६-३, ६-१, ६-३ अशा फरकाने चार सेटवर विजय नाेंदवला. त्यामुळे त्याला पुढची फेरी गाठता अाली. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने दमदार पुनरागमन करताना हा रंगतदार सामना जिंकला.  


भारताचे टेनिस स्टार विजयी
सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत भारताच्या युवांनीही शानदार कामगिरी करताना विजयाची नाेंद केली. भारताच्या लिएंडर पेस अाणि पुरव राजाने दुहेरीत विजयी सलामी दिली. त्यांनी लढतीत निकाेलाेज-अांद्रियास हेदरचा पराभव केला. त्यांनी ६-२, ६-३ असा सामना जिंकला.  तसेच राेहन बाेपन्ना-दिविज शरणनेही दुहेरीचा सामना जिंकला. राेहन बाेपन्नाने अापला सहकारी राॅजरसाेबत सामन्यात रेयाॅन-वासेकचा ६-२, ७-६ ने पराभव केला. दिविजने राजीवसाेबत सलामीला मारियस-व्हिक्टरवर मात केली. त्यांनी ७-६, ६-४ ने सामना जिंकला. यामुळे त्यांना अापली विजयी लय कायम ठेवता अाली. अाता पुढच्या फेरीतही बाजी मारून अागेकूच करण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल.

 

वावरिंकाचा अनपेक्षितपणे पराभव  
सहाव्या मानांकित स्टॅन वावरिंकाला स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत अापला गाशा गुंडाळावा लागला. त्याने विजयासाठी दिलेली झंुज सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे त्याच्यावर स्पर्धेतून बाहेर हाेण्याची नामुष्की अाेढावली अाहे. अमेरिकेच्या सांदाग्रेनने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सनसनाटी विजय संपादन केला. त्याने सामन्यामध्ये वावरिंकाचा पराभव केला. त्याने ६-२, ६-१, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुसरीकडे वावरिंकाला तिन्ही सेटवर पुनरागमन करण्यात शेवटपर्यंत यश मिळाले नाही. 

 

मुुगुरुझाचे अाव्हान संपुष्टात 
दाेन वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन मुगुरुझाला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला युवा खेळाडू हैस सु वेईने पराभूत केले. चीनच्या हैस सु वेईने दुसऱ्या फेरीत सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने ७-६, ६-४ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. तिने सरस खेळी करताना अवघ्या १ तास ५९ मिनिटांमध्ये हा रंगतदार सामना जिंकला. या पराभवामुळे तिसऱ्या मानांकित मुगुरुझाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला किताबाची प्रबळ दावेदार मानले जात हाेते. मात्र, तिला अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही.

 

सिमाेना हालेपची बाऊचर्डवर मात 
अव्वल मानांकित सिमाेना हालेपने दुसऱ्या फेरीत एकतर्फी विजय संपादन केला. तिने बाऊचर्डचा पराभव केला. तिने ६-२, ६-२ अशा फरकाने सहज विजय साकारला. तिने दाेन्ही सेटवर अाक्रमक सर्व्हिस करताना हे यश संपादन केले. त्यामुळे तिला स्पर्धेतील अापले अाव्हान कायम ठेवता अाले. अाता या विजयाच्या बळावर अव्वल मानांकित सिमाेनाने किताब जिंकण्याचा अापला दावा अधिक मजबूत केला अाहे. त्यामुळे तिच्यावर महिला गटात सर्वांची नजर असणार अाहे.  

 

 

शारापाेवा तिसऱ्या फेरीत
रशियन टेनिस स्टार मारिया शारापाेवाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिने दुसऱ्या फेरीत लॅटव्हियाच्या अनास्थासिजा सेवात्साेवाला पराभूत केले. तिने सरळ दाेन सेटमध्ये ६-१, ७-६ ने विजय संपादन केला. यासह तिला पुढची फेरी गाठता अाली. डाेपिंगप्रकरणी बंदीनंतर काेर्टवर पुनरागमन करताना अाता पहिला ग्रँडस्लॅम किताब जिंकण्याचा तिचा मानस अाहे. यासाठी ती अागेकूच करत अाहे.   

बातम्या आणखी आहेत...