आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमार, काॅटिन्हाेच्या गाेलने ब्राझील टीमने गाठले गटात अव्वल स्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट पीटर्सबर्ग- जगातील सर्वात महागड्या खेळाडू नेमार (९७+७ वा मि.) अाणि फिलीप काॅटिन्हाे (९०+१ वा मि.) यांच्या गाेलच्या बळावर ब्राझीलच्या संघाने २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत शुक्रवारी विजयाचेे खाते उघडले. पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाने इ गटातील अापल्या दुसऱ्या सामन्यात काेस्टारिकावर मात केली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ब्राझीलने २-० अशा फरकाने सामना जिंकला. अतिरीक्त वेळेत दाेन गाेल करून ब्राझीलने सामना जिकंला. हा ब्राझीलचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वीचा पहिलाच सामना बराेबरीत राहिला हाेता. त्यामुळे अाता एका विजयासह ब्राझील संघाने इ गटात अव्वल स्थान गाठले. 


सिल्वाच्या नेतृत्वात ब्राझील संघाने विजयासह अाता ४ गुणांसह अव्वल स्थानावर धडक मारली. अाता ब्राझीलचा गटातील तिसरा सामना २७ जुन राेजी सर्बियाशी हाेईल. सर्बियाने एका विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली अाहे. त्यामुळे या टीमवर मात करून अापले पुढच्या फेरीतील स्थान निश्चित करण्याचा ब्राझीलचा प्रयत्न असेल. 


तसेच निर्धारित ९० मिनिटांपर्यंत बलाढ्य ब्राझीलच्या टीमला शुन्य गाेलने बराेबरीत राेखणाऱ्या काेस्टारिकाचा विजयाचा प्रयत्न काहीसा अपुरा ठरला. त्यामुळे या टीमला अतिरीक्त वेळेत सुमार खेळीचा फटका बसला. त्यामुळे टीमला पराभवाला समाेरे जावे लागले. सरस खेळी करताना काेस्टारिकाने सामना बराेबरीत ठेवला हाेता. मात्र, त्यानंतर टीमला अापला डिफेंन्स कायम ठेवता अाला नाही. याचाच फायदा घेत ब्राझीलच्या दाेन्ही अनुभवी खेळाडूंनी सुरेख गाेल केले. त्यामुळेच ब्राझीलच्या टीमला हा एकतर्फी विजय साकारता अाला. अाता काेस्टारिकाला गटातील तिसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. बुधवारी हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. त्यामुळे या सामन्यातील विजयासाठीही काेस्टारिकाला माेठी मेहनत घ्यावी लागेल. यातूनच काेस्टारिकाच्या खेळाडूंना अाता माेठी मेहनत घ्यावी लागेल. अाता विजयासह ब्राझीलच्या टीमने किताबाचा अापला दावा मजबूत केला अाहे. 


मुसाचा गाेलचा डबल धमाका; नायजेरियाची अाइसलँडवर मात 
वाेल्गाेगाद्र। सुपरस्टार स्ट्रायकर मुसाने (४९, ७५ वा मि.) गाेलचा डबल धमाका उडवला. यासह त्याने नायजेरियाला विश्वचषकात विजयाचे खाते उघडून दिले. जागतिक क्रमवारीत ४८ व्या स्थानावर असलेल्या नायजेरियाने डी गटातील दुसऱ्या सामन्यात अाईसलॅंडचा पराभव केला. नायजेरियाने २-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह या संघाने पुढच्या फेरीतील प्रवेशाच्या अापल्या अाशा कायम ठेवल्या. अाता नायजेरियाचा गटातील तिसरा सामना मंगळवारी मेसीच्या अर्जेटिनाशी हाेणार अाहे. त्यामुळे या सामन्यात बाजी मारून पुढची फेरी गाठण्याचा नायजेरिया संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे सलामीला सनसनाटी कामगिरी करणाऱ्या अाइसलँडचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे या टीमची गुणतालिकेत घसरण झाली. अाता या टीमला स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी माेठी कसरत करावी लागेल. कारण, अाइसलँडचा गटातील तिसरा सामना क्राेएशियाशी हाेणार अाहे. सध्या गटात अव्वल स्थानावर असलेला क्राेएशिया संघ जबरदस्त फाॅर्मात अाहे. या टीमने सलग दुसऱ्या विजयासह अव्वल स्थान गाठले अाहे. त्यामुळे क्राेएशियाला राेखण्यासाठी सामन्यात अाइसलँडच्या खेळाडूंना चमत्कारिक कामगिरी करावी लागेल. यातूनच टीमला अाव्हान कायम ठेवता येईल. 


स्वित्झर्लंड दुसऱ्या स्थानावर; सर्बियावर २-१ ने केली मात 
सलामीच्या विजयाने अात्मविश्वास दुणावलेल्या सर्बियाचा दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. झाहका (५२ वा मि.) अाणि शाकिरी (९० वा मि.) यांनी केलेल्या गाेलच्या बळावर स्वित्झर्लंडने इ गटात शानदार विजय मिळवला. या टीमने सर्बियावर २-१ ने मात केली. या विजयाने स्वीसने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. 

बातम्या आणखी आहेत...