आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलची उपांत्यपूर्व फेरीत धडक; ८८ वर्षांत १६ व्यांदा ब्राझील अंतिम अाठमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समारा- पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाने अापला किताबाचा दावा मजबूत केला. ब्राझीलने साेमवारी नाॅकअाऊटच्या सामन्यात बाजी मारून २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ब्राझीलने अंतिम १६ च्या सामन्यात मेक्सिकाेचा पराभव केला. ब्राझीलने २-०  ने सामना जिंकला. नेमार  (५१ वा मि.)  अाणि राॅबर्टाेने (८८ वा मि.) गाेल करून ब्राझीलचा विजय निश्चित केला. याच पराभवामुळे जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेल्या मेक्सिकाेचे अाव्हान संपुष्टात अाले.


नेमारवरचे सावट दूर 
राेनाल्डाे अाणि मेसीच्या अपयशानंतर गत काही तास ब्राझीलच्या नेमारवरही पॅकअपचे सावट हाेते. मात्र, नेमारने यशस्वीपणे गाेल करून अापल्या टीमला पुढच्या फेरीतील प्रवेश मिळवून दिला. त्यामुळे ४८ तासांत बलाढ्य संघाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात येण्याचे सावट ब्राझीलने दूर सारले. रविवारी २४ तासांत तीन माेठे संघ  बाहेर पडले.

बातम्या आणखी आहेत...