आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • ​Premier Badminton League 2018 Final: Carolina Marin Side Hyderabad Hunters Wins Maiden PBL Title

ग्लॅमरस कॅरोलिना मारिनला म्हटले जाते स्पॅनिश नदाल गर्ल, का ते घ्या जाणून...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनची कॅरोलिना मारिन प्रो-बॅडमिंटन लीगसाठी सध्या भारतात आहे. - Divya Marathi
स्पेनची कॅरोलिना मारिन प्रो-बॅडमिंटन लीगसाठी सध्या भारतात आहे.

स्पोर्ट्स डेस्क- अखेरच्या सामन्यापर्यंत रंगलेल्या प्रीमिअर बॅडमिंटन लीगचे विजेतेपद अखेर यजमान हैदराबाद हंटर्सने आपल्या नावावर केले. अंतिम फेरीत हैदराबादने बेंगळूरु ब्लास्टर्सवर 4-3 असा विजय मिळवला. चार सामन्यांनंतर दोन्ही संघांचे 3-3 असे समान गुण झाले होते, पण निकराच्या झुंजीत हैदराबादने बाजी मारली. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हैदराबादच्या कॅरोलिन मरीनने बेंगळूरुच्या क्रिस्टी ग्लिमोरवर 15-8,15-14 असा विजय मिळवला. निर्णायक आणि अखेरच्या लढतीत हैदराबादच्या सात्विक साईराज रानकीरेड्डी व पिआ झेबादिआ बर्नाडेट यांनी बेंगळूरुच्या किम सा रँग व सिक्की रेड्डी यांच्यावर 15-11, 15-12 असा विजय मिळला. ग्लॅमरस आहे कॅरोलिना, म्हणतात स्पनिश नदाल गर्ल.....

 

- कोर्टवर खूपच सिंपल राहणारी ही शटलर पर्सनल लाइफमध्ये खूपत ग्लॅमरस आहे. 
- 24 वर्षाची मारिनचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोजने भरले आहे. 
- कॅरोलिना मारिनला स्पेनची गर्ल नदाल म्हटले जाते. याचे कारण म्हणजे सुपरस्टार टेनिस प्लेयर राफेल नदाल हा सुद्धा स्पेनचाच आहे. 
- फुटबॉलसाठी स्वर्ग समजल्या जाणा-या स्पेनमध्ये रॅकेट गेम राफेल नदालमुळे प्रसिद्ध झाला आहे.
- अशा देशात स्वत:च्या बळावर दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनणे कॅरोलिनासाठी सोपी गोष्ट नव्हती.
- रिओ ऑलिंपिक गेम्स 2016 मध्ये वुमन्स सिंगल्सच्या फायनलमध्ये पीव्ही सिंधूला हारवत गोल्ड मेडल जिंकले होते. 
- गेल्या दोन वर्षापासून ती भारतातील प्रो- बॅडमिंटन लीग खेळायला येत आहे. 
- मारिनने अनेकदा भारताच्या दोन्ही अव्वल स्टार शटलर्स पीव्ही सिंधू आणि सायना नेहवालला हारवले आहे. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कॅरोलिना मारिनची निवडक ग्लॅमरस फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...