Home | Sports | Other Sports | Commonwealth Games 2018 Tejaswini Sawant Wins Gold News And Updates

तेजस्विनी राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2018, 12:22 AM IST

भारताच्या १५ वर्षीय नेमबाज अनीश भनवालने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत ‘सुवर्ण’वेध घेताना इतिहास रचला. स्पर्धेत सुवर्णपदक

 • Commonwealth Games 2018 Tejaswini Sawant Wins Gold News And Updates

  गाेल्ड काेस्ट- भारताच्या १५ वर्षीय नेमबाज अनीश भनवालने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत ‘सुवर्ण’वेध घेताना इतिहास रचला. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ताे सर्वात युवा नेमबाज ठरला. त्याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अव्वल स्थान गाठले. गत अाठवड्यात हाच बहुमान भारताच्या १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने पटकावला हाेता. तिला अनीशने मागे टाकले.


  याशिवाय महाराष्ट्राची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन प्रकारात सुवर्णपदक अाणि अंजुम मुदगिलने राैप्यपदक जिंकले.


  अाॅलिम्पिक पदक विजेत्या बजरंगने कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठाेपाठ कुस्तीपटू माैसम खत्री, पूजा, अंजुम मुदगिल, मनिका-माैमा दासने राैप्यपदकाची कमाई केली. दिव्या काकरान, नमन, मनाेज कुमार व माे. हुस्साद्दीन कांस्यपदकाचे मानकरी ठरले.


  यातून भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी एकूण ११ पदकांची कमाई केली. यात तीन सुवर्णांसह प्रत्येकी चार राैप्य अाणि कांस्यपदकाचा समावेश अाहे. यासह भारताने एकूण ४२ पदकांसह पदक तालिकेतील अापले तिसरे स्थान अधिक मजबूत केले.


  पूजाची झुंज अपयशी; राैप्यची मानकरी

  भारताच्या पूजा ढांडाने सुवर्णपदकासाठी शर्थीची झंुज दिली. मात्र, फायनलमध्ये तिला अपयशाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे तिला ५७ किलाे वजन गटात राैप्यपदकावर समाधान मानावे लागले.

  तीन वेळा सहभागी हाेत तेजस्विनीने जिंकली ७ पदके
  नेमबाज तेजस्विनी सावंतने सलग दुसऱ्या िदवशी भारताला पदक मिळवून दिले. तिने ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने नीलिंगमध्ये १५२.४ व प्राेन पाेझिशनमध्ये १५७.१ गुणांची कमाई केली. यादरम्यान तिने विक्रमी गुण संपादन केले. यामुळे तिला गत चॅम्पियन जैसमिनला मागे टाकता अाले. तेजस्विनीचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सातवे पदक ठरले. यापूर्वी तिने २००६ मेलबर्न राष्ट्रकुलमध्ये दाेन सुवर्ण, २०१० दिल्ली राष्ट्रकुलमध्ये दाेन राैप्य व कांस्य जिंकले हाेते. त्यानंतर अाता २०१८ राष्ट्रकुलमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण व राैप्यपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक ७ पदके जिंकणारी तेजस्विनी ही भारताची पहिली नेमबाज ठरली.

  टेटे : मनिका-माैमाला महिला दुहेरीत राैप्य
  भारताच्या मनिकाने अापली सहकारी माैमा दाससाेबत टेबल टेनिसमध्ये राैप्यपदकाची कमाई केली. त्यांनी महिला दुहेरीमध्ये दुसरे स्थान गाठले. भारताच्या या जाेडीला फायनलमध्ये सिंगापूरच्या तियानवेई अाणि मेंगयुने पराभूत केले. त्यामुळे भारताची जाेडी दुसऱ्या स्थानावर राहिली.

  बॅडमिंटन : सायना, श्रीकांत सेमीफायनलमध्ये
  सायना नेहवाल अाणि नंबर वन के. श्रीकांत बॅडमिंटनमध्ये पदकापासून दाेन पावलावर अाहेत. श्रीकांतने पुरुष एकेरीच्या अंतिम अाठमध्ये सिंगापूरच्या जिन रेई रेयानवर ३४ मिनिटांमध्ये २१-१५, २१-१२ ने मात केली. यासह त्याने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. त्यापाठाेपाठ सायनाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत कॅनडाच्या रेचल हाेंडेरिचवर २१-८, २१-१३ ने मात केली.

  नेमबाजी : १५ वर्षीय अनीशचे विक्रमी सुवर्ण
  युवा नेमबाज अनीश भनवालाने राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी सुवर्णपदक पटकावले. यासह १५ वर्षीय अनीश हा राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वात युवा चॅम्पियन ठरला. त्याने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारामध्ये अव्वल स्थान गाठले. त्याने फायनलमध्ये विक्रमी ३० गुण संपादन केले.

  कुस्ती : दिव्याने २६ सेकंदांत जिंकले कांस्य
  भारताची युवा मल्ल दिव्या काकरानने महिलांच्या ६८ किलाे वजन गटात अवघ्या २६ सेकंदांमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. तिने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बांगलादेशच्या शैरीन सुलतानाला क्षणात चितपट केले. यासह ती कांस्यपदकाची मानकरी ठरली.

  पाच बाॅक्सर फायनलमध्ये; तिघांना कांस्य
  भारताच्या बाॅक्सर अमित फंगल (४६ कि.), गाैरव साेळंकी (५२ कि.), मनीष काैशिक (६० कि.), विकास कृष्णन (७५ कि.) अाणि सतीशकुमारने (९१ कि.) यांनी अापापल्या गटाच्या फायनलमध्ये धडक मारली. यासह त्यांनी पदके निश्चित केली. दुसरीकडे उपांत्य सामन्यातील पराभवाने मनाेजकुमार (६९ कि.), नमन तंवर (९१ कि.) अाणि माे. हुसामुद्दीनने (५६ कि.) कांस्यपदके जिंकली.

  पुढील स्‍लालडवर पाहा, फोटो...

 • Commonwealth Games 2018 Tejaswini Sawant Wins Gold News And Updates
 • Commonwealth Games 2018 Tejaswini Sawant Wins Gold News And Updates

Trending