आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA : विश्वचषक सुरू झाल्यानंतर अस्तित्वात अालेल्या देशाला वर्ल्ड चॅम्पियनची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्को- जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या क्राेएशियाने फुटबाॅलच्या विश्वातील अनेक तज्ज्ञांचे अंदाज साफ चुकीचे ठरवले. अापल्या सर्वाेत्तम कामगिरीची लय कायम ठेवताना या संघाने पहिल्यांदाच फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या फायनलमधील अापला प्रवेश निश्चित केला. क्राेएशियाने बुधवारी रात्री उपांत्य सामन्यात माजी चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. यासह संघाने अतिरिक्त वेळेत २-१ ने हा अटीतटीचा सामना जिंकला. याच लक्षवेधी विजयाच्या बळावर अाता क्राेएशियाने पहिल्यांदा विश्वविजेता हाेण्याचे संकेत दिले. 


वर्ल्डचॅम्पियन हाेण्याचा पल्ला गाठण्यासाठी अाता क्राेेएशियाला शनिवारी माजी चॅम्पियन फ्रान्सच्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बलाढ्य बेल्जियमला नमवून फ्रान्स संघाने अंतिम फेरी गाठली अाहे. फ्रान्स संघाचा  अाता १९९८ नंतर चॅम्पियन हाेण्याचा मानस अाहे.  


१९९० मध्ये स्वतंत्र देश : क्राेेएशिया संघाने अल्पावधीत विश्वचषकाच्या फायनलपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला अाहे. क्राेएशिया हा देश १९९१ मध्ये अस्तित्वात अाला. त्यामुळे फिफा विश्वचषक सुरू झाल्यानंतर हा देश स्वतंत्र झाला. फिफाच्या वर्ल्डकपला १९३० मध्ये सुरुवात झाली. यादरम्यान अाठ संघांनी विश्वचषक पटकावला. हे अाठ संघांचे देश १९३० पूर्वीच स्वतंत्र झालेले अाहेत. त्यामुळे क्राेएशियाचा संघ नवखा मानला जाताे.


लाल रंगाची जर्सी घालून कॅबिनेट मीटिंग
क्राेएशियाने २१ व्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. यामुळे देशभरात माेठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हाच उत्साह क्राेएशियाच्या कॅबिनेट मीटिंगमध्येही दिसून अाला. या बैठकीला  प्रत्येकाने  राष्ट्रीय  संघाची लाल रंगाची जर्सी घातली.  यादरम्यान पंतप्रधान अांद्रेज प्लेनकाेविच यांनीही क्राेएशिया फुटबाॅल संघाचे खास शब्दात काैतुक केले. 


क्राेएशियाचे पदार्पण; फ्रान्स चॅम्प  
 नवख्या क्राेएशिया संघाने १९९८ मध्ये पहिल्यांदा विश्वचषकात पदार्पण केले हाेते. याच विश्वचषकात जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्स संघाने किताब पटकावला हाेता. यादरम्यान क्राेएशियाने उपांत्य फेरीचा पल्ला यशस्वीपणे गाठला हाेता. मात्र,या संघाला फ्रान्सने पराभूत केले हाेते. त्यानंतर फ्रान्स संघाने ही लय कायम ठेवताना अंतिम सामना जिंकला. यामुळे फ्रान्सला चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळाला. यादरम्यान क्राेएशियाचा संघ हा विश्वचषकात फारच नवखा संघ हाेता.


फिफाने इंग्लंड फुटबॉल संघटनेवर ४५ लाखांची केली दंडात्मक कारवाई!
फिफाने इंग्लंड फुटबॉल संघटनेला एफएवर ४५ लाखांचा दंड लावला आहे. इंग्लंडच्या डेले एली, एरिक डायर, रहिम स्टर्लिंगने स्वीडनविरुद्ध सामन्यात अनधिकृत मोजे घातले होते. या तिन्ही खेळाडूंनी अधिकृत प्रायोजक नायकीच्या मोजेवर दुसऱ्या कंपनीचे मोजे घातले होते. फिफाने खेळाडूंना यापूर्वीच सूचना केली होती. फिफाने म्हटले की, इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत अनेक वेळा अधिकृत साहित्य वापरले आहे. याप्रकरणी स्वीडनच्या फुटबॉल संघटनेवरदेखील हा दंड लावण्यात आला आहे. यापूर्वी फिफाने अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघटनेवर ७२ लाखांचा दंड लावला होता.


इंग्लंड-बेल्जियम उद्या तिसऱ्या स्थानासाठी झुंजणार
उपांत्य सामन्यातील अनपेक्षित पराभवामुळे माजी चॅम्पियन इंग्लंड अाणि बेल्जियम संघाचे यंदाचा किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे या संघांना अाता तिसरे स्थान पटकावण्याची माेठी संधी अाहे. यासाठी हे दाेन्ही संघ उद्या शनिवारी झंुजतील. त्यामुळे या सामन्यात अव्वल कामगिरी करताना तिसऱ्या स्थानावर धडक मारण्याचा दाेन्ही संघाचा मानस अाहे. यातूनच हा सामना अधिक रंगतदार हाेईल. इंग्लंडला शेवटच्या काही मिनिटांत सुमार खेळीचा फटका बसला. टीमने उपांत्य सामना गमावला. 

बातम्या आणखी आहेत...