आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dane Will Be The World Champion For The First Time In The Qualifying Round

दाेन वेळचा विश्वविजेता विंडीज संघ पहिल्यांदा खेळणार पात्रता फेरीत; दाेन संघांना मिळणार वर्ल्डकपचे तिकीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे- पुढच्या वर्षी २०१९ मध्ये इंग्लंड येथे अायसीसीचा १२ वा वनडे वर्ल्डकप रंगणार अाहे. या स्पर्धेसाठीचे अाठ संघ निश्चित झाले अाहेत. उर्वरित दाेन संघांसाठी पात्रता फेरीचे अायाेजन करण्यात अाले. येत्या रविवारपासून विश्वचषकाच्या पात्रता फेरीला झिम्बाब्वे येथे सुरुवात हाेईल. दाेन वेळचा विश्वविजेता विंडीज संघ या पात्रता फेरीत प्रथमच सहभागी हाेणार अाहे. ही पहिलीच वेळ अाहे, ज्यामध्ये विश्वविजेत्या टीमचा समावेश अाहे.   


 नुकताच अायर्लंड अाणि अफगाणिस्तानच्या टीमला कसाेटीचा दर्जा मिळाला अाहे. त्यामुळे वनडेच्या वर्ल्डकपसाठी अाता चार टीम उत्सुक अाहेत. यातील दाेन संघांना पात्रता फेरीतील अव्वल कामगिरीच्या बळावर विश्वचषकातील अापला प्रवेश निश्चित करण्याची संधी अाहे. त्यामुळे कसाेटी खेळणाऱ्या दाेन संघांना पात्रता िवना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. असे अायसीसीच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच घडणार अाहे.  त्यामुळे या दाेन पात्र टीमवर सर्वांचे लक्ष लागून असेल. 

 

गेल टॉप स्काेरर

विंडीजचा क्रिस गेल हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज अाहे. त्याच्या नावे वनडेत ९४२० धावांमध्ये २२ शतकांची नाेंद अाहे.

 

४ संघ, ४ वर्षांसाठी मिळेल वनडे स्टेटस  
- ३४ सामने या स्पर्धेत हाेतील. पहिला सामना ४ मार्च राेजी अाणि फायनल २५ मार्च राेजी  
- या पात्रता फेरीतील सर्वच सामन्यांना अांतरराष्ट्रीय वनडेची मान्यता अाहे. म्हणजेच या सामन्यातील विक्रमांची नाेंद हाेईल.    
- स्पर्धेनंतर हाॅलंड अाणि टाॅप-३ वर असलेल्या टीमला २०२२ पर्यंत   वनडे खेळण्याचा दर्जा     
- हाॅलंडला अायसीसी क्रिकेट लीग चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे वनडेचा दर्जा मिळालेला अाहे. 
 
असा अाहे स्पर्धेचा फाॅरमॅट
- १० संघांची दाेन गटात प्रत्येक पाच असा समावेश  
- गटामध्ये लीग सामन्यांचे अायाेजन. त्यानंतर दाेन्ही गटातील अव्वल टाॅप-३ संघांचा सुपर सिक्समध्ये प्रवेश.  
- सुपर सिक्सनंतर टाॅप-दाेेन संघ अंतिम फेरीत दाखल हाेतील. हेच दाेन संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील.  
 
गेलमुळे पात्रता फेरी खास  
 
- १० पैकी सहा संघांनी यापूर्वी वनडेचा वर्ल्डकप खेळलेला अाहे. अशास विंडीजचा मार्ग अधिक खडतर असेल.  
- क्रिस गेल, एविन लेविस, सॅम्युअल्ससारखे अनेक खेळाडू विक्रमाला गवसणी घालतील.  
- नेपाळने नुकत्याच  स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे टीमकडून सनसनाटी कामगिरीची अाशा.  
 
स्पर्धेतील सहभागी संघ 
अ गट: 
विंडीज, अायर्लंड, हाॅलंड, युएई, पापुअा न्यू गिनिअा.  
ब गट : झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, हाँगकाँग, नेपाळ, स्काॅटलंड
 
बांगलादेश भूषवणार हाेते या स्पर्धेचे यजमानपद
अायसीसीच्या पुढच्या वर्षीच्या वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या अायाेजनाची जबाबदारी बांगलादेश क्रिकेट मंडळावर साेपवण्यात अाली हाेती. मात्र, अायसीसीला अाशा हाेती की, बांगलादेश टीम थेट पात्र ठरू शकणार नव्हता. 
 
२०१९ च्या वर्ल्डकपमध्ये १० संघ  
अायसीसीने पुढच्या वर्षी हाेणाऱ्या इंग्लंडमधील वर्ल्डकपमध्ये १० संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. यजमानपद भूषवत असल्याने इंग्लंडला थेट एन्ट्री देण्यात अाली. तसेच अायसीसीच्या क्रमवारीमधील अव्वल सात संघांना थेट प्रवेश मिळाला. यामध्ये भारतासह अाॅस्ट्रेलिया, द. अाफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेशचा समावेश अाहे. अाता उर्वरित दाेन संघांचा पात्रता फेरीतून प्रवेश निश्चित हाेईल.
बातम्या आणखी आहेत...