आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट काेहलीने रचला विश्वविक्रम; कर्णधाराच्या भूमिकेत वेगाने गाठला ३ हजार धावांचा पल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीड्स- नंबर वन इंग्लंड संघाने घरच्या मैदानावर सरस खेळी करताना मंगळवारी टीम इंडियावर मालिका विजय संपादन केला. यजमानांनी तिसरा अाणि निर्णायक वनडे सामना ८ गड्यांनी जिंकला. यासह इंग्लंड संघाने तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. याशिवाय इंग्लंडने घरच्या मैदानावरील सलग दुसऱ्या मालिका पराभवाची नामुष्कीही टाळली. यापूर्वी भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका गत अाठवड्यात २-१ ने जिंकली हाेती. अाता भारत अाणि इंग्लंड यांच्यात १ अाॅगस्टपासून पाच कसाेटी सामन्यांची मालिका रंगणार अाहे. 


भारताने ८ बाद २५६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४४.३ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. कर्णधार माेर्गन (८८) अाणि ज्याे रुट (१००) यांनी अभेद्य १८६ धावांची भागीदारी रचली अाणि इंग्लंडचा मालिका विजय निश्चित केला. संघाच्या विजयात सलामीच्या व्हिन्सी २७ अाणि जाॅनी बैयरस्ट्राेने ३० धावांचे महत्वाचे याेगदान दिले. 


काेहलीची विश्वविक्रमाला गवसणी
फाॅर्मात असलेल्या कर्णधार विराट काेहलीने मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घालण्याची अापली माेहीम कायम ठेवली. त्याने मंगळवारी यजमान इंग्लंडविरुद्ध सामन्यादरम्यान शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने ७१ धावांची तुफानी खेळी केली. याच अर्धशतकाच्या बळावर त्याने विश्वविक्रमाची नाेंद केली. त्याच्या नावे कर्णधाराच्या भूमिकेत वेगाने वनडेत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नाेंद झाला अाहे. यादरम्यान त्याने दक्षिण अाफ्रिकेच्या फलंदाज डिव्हिलियर्सलाही मागे टाकले. 


इंग्लंड संघाचाही विक्रम 
इंग्लंड संघाने भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेदरम्यान एकही नाे बाॅल टाकला नाही. यातून इंग्लंड संघाने विक्रम रचला. अशा प्रकारे इंग्लंड संघाने वनडेत ४२५७ चेंडू हे नाे बाॅल शिवाय टाकले अाहेत. अशी कामगिरी करणारा हा पहिला संघ ठरला. 


४९ डावांत विराट काेहलीने पूर्ण केल्या ३ हजार धावा 
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ७२ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकारांच्या अाधारे ही खेळी केली. यासह त्याला शानदार अर्धशतक साजरे करता अाले. यातूनच त्याने कर्णधाराच्या भूमिकेत सर्वात वेगवान ३ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने वनडेत हा पल्ला अवघ्या ४९ डावात गाठला. वनडेत ताे सर्वात कमी डावात पल्ला गाठणारा जगातील पहिला कर्णधार ठरला. यामुळे त्याच्या नावावर अाता या विक्रमाची नाेंद झाली. याशिवाय त्याने अाफ्रिकेच्या डिव्हिलियर्सला मागे टाकले. डिव्हिलियर्सच्या नावे ६० डावांत या विक्रमाची नाेंद हाेती. अातापर्यंत हा विक्रम त्याच्याच नावे हाेता. मात्र, यात विराट काेहलीने अव्वल स्धानावर धडक मारली अाहे. तसेच यात भारतीय संघाच्या माजी कर्णधार धाेनी (७० डाव) अाणि साैरव गांगुलीचाही (७४) समावेश अाहे.

बातम्या आणखी आहेत...