Home | Sports | Other Sports | FIFA WORLD CUP: England goes to semi final

FIFA WORLD CUP: इंग्लंड 28 वर्षांनी उपांत्य फेरीत, स्वीडनला प्रथमच दिली 2-0ने मात

दिव्‍य मराठी | Update - Jul 08, 2018, 08:32 AM IST

इंग्लंडने २८ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शनिवारी इंग्लंडने स्वीडनचा २-०ने पराभव केला.

 • FIFA WORLD CUP: England goes to semi final

  समारा - इंग्लंडने २८ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शनिवारी इंग्लंडने स्वीडनचा २-०ने पराभव केला. हॅरी मग्वायर याने ३० व्या, तर डेले एलीने ५९व्या मिनिटाला गाेल केला. इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये स्वीडनला प्रथमच हरवले. यापूर्वी वर्ल्डकपमध्ये दोघांत झालेले दोन्ही सामने अनिर्णीत राहिले होते. इंग्लंड तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला. १९६६मध्ये इंग्लंड जेता ठरला, तर १९९० मध्ये चौथ्या स्थानी होता.

  हॅरी मागुर्रे (३० वा मि.) अाणि अली (५८ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला अाणि इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला. यामुळे या टीमला पुढच्या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश करता अाला. पराभवामुळे स्वीडनच्या टीमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दरम्यान टीमचा विजयाचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला.

  २८ वर्षांनंतर इंग्लंड अंतिम चारमध्ये : इंग्लंडच्या संघाने तब्बल २८ वर्षांनंतर वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठण्याची नेत्रदीपक कामगिरी केली. या संघाने पुन्हा एकदा सरस खेळी करताना हा पल्ला गाठला. यापूर्वी इंग्लंड संघाने १९९० च्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला हाेता. मात्र, त्यानंतर या टीमला ही फेरी गाठण्यासाठी दाेन दशके प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर अाता इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. दुसरीकडे अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवण्याचा स्वीडन संघाचा प्रयत्न अपुरा ठरला. या संघाला अाव्हान कायम ठेवत पुढची फेरी गाठण्याचा विश्वास हाेता. मात्र, खेळाडूंच्या सुमार कामगिरीचा या टीमला फटका बसला.


  हॅरी ठरला दुसरा
  इंग्लंडच्या विजयात हॅरी मागुर्रेने माेलाचे याेगदान दिले. त्याने सामन्यात ३० व्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले. त्याने स्वीडनच्या गाेलरक्षकाला हुलकावणी देऊन हा राेमहर्षक गाेल केला. यासह त्याने अापल्या नावे पहिल्या अांतरराष्ट्रीय गाेलची नाेंद केली. तसेच विश्वचषकाच्या क्वार्टर फानयल वा सेमीफायनलमध्ये करिअरचा पहिला अांतरराष्ट्रीय गाेल करणारा हॅरी हा इंग्लंडचा दुसरा फुटबाॅलपटू ठरला. यापूर्वी, एलन मुलेरीने १९७० मध्ये असा पराक्रम गाजवला हाेता. त्याने जर्मनीविरुद्ध असा गाेल केला हाेता.


  - दोन्ही संघांदरम्यान हा २५वा सामना. इंग्लंडने स्वीडनला नवव्यांदा हरवले तर स्वीडन सात वेळा जिंकला. इंग्लंडने या वर्ल्डकपमध्ये १० गोल केले.
  स्वीडनच्या गोलकीपरचा गोल रोखण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.
  - डेले एली (२२ वर्षे ८७ दिवस) इंग्लंडचा वर्ल्डकपमध्ये गोल करणारा दुसरा युवा खेळाडू. मायकल ओव्हेन (१८ वर्षे १९० दिवस) याने यापूर्वी १९९८ मध्ये रोमानियाविरुद्ध गोल केला होता.

Trending