आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स संघ १२ वर्षांनंतर अंतिम फेरीत दाखल; सॅम्युअलच्या गाेलने झाला बेल्जियमचा पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट पीटर्सबर्ग- माजी विश्वविजेत्या फ्रान्स संघाने मंगळवारी मध्यरात्री फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बलाढ्य बेल्जियमचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्स संघाने १-० अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. सॅम्युअलने (५१ वा मि.) शानदार गाेल करून फ्रान्सचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. यासह फ्रान्सच्या संघाने करिअरमध्ये तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या फरयनलमध्ये धडक मारली. तसेच या संघाला अाता १२ वर्षानंतर ही फेरी यशस्वीपणे गाठता अाल. यापूर्वी फ्रान्स संघाने १९९८ अाणि २००६ मध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला हाेता. 


किताबाचा दावा मजबूत
माजी विश्वविजेत्या फ्रान्स संघाने बलाढ्य बेल्जियमला धुळ चारली. यासह फ्रान्सचा अाता दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याचा दावाही मजबुत झाला. अाता या संघाला रविवारी १५ जुलै राेजी फायनलमध्ये क्षमता सिद्ध करावी लागणार अाहे. 


शनिवारी तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम मैदानावर
पराभवामुळे अपयशी ठरलेल्या बेल्जियमला अाता तिसऱ्या स्थानाची संधी अाहे. यासाठी हा संघ शनिवारी मैदानावर उतरणार अाहे. या टीमसमाेर दुसऱ्या उपांत्य लढतीती पराभूत संघ असेल. 


इंग्लंड-क्राेएशिया अाज उपांत्य सामना 
जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेला इंग्लंड संघ अाता फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला अाहे. मात्र, या टीमला उपांत्य सामन्यात क्राेएशियाच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बुधवारी मध्यरात्री इंग्लंड अाणि क्राेएशिया संघ समाेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांची नजर फायनलचे तिकीट मिळवण्याकडे लागली अाहे. चमत्कारिक खेळीच्या अाधारे या दाेन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली.


राेनाल्डाेचा युवेंट्ससाेबत करार; माद्रिदमधून बाहेर 
यंदाच्या विश्वचषकात अामच्या उरुग्वे संघाने समाधानकारक कामगिरी केली. त्यामुळे अाम्ही या यशावर समाधानी अाहाेत, अशी प्रतिक्रिया टीमच्या लुईस सुअारेझने दिली. या टीमचा पुढची फेरी गाठण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे उरुग्वेला लढतीत फ्रान्सविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला. कवानीच्या अनुपस्थितीत या संघाने कस लावला. यात टीमचे खेळाडू अपयशी ठरले. 

बातम्या आणखी आहेत...