आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरूच्या विजयाने अाॅस्ट्रेलिया संघ बाहेर; डेन्मार्क नाॅकअाऊटमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेची- यंदाच्या विश्वचषकातून बाहेर झालेल्या पेरू संघाने मंगळवारी गटातील अापल्या तिसऱ्या सामन्यात सनसनाटी विजय संपादन केला. या विजयासह पेरूने अाॅस्ट्रेलियाच्या टीमला बाहेर केले. पेरूने २-० अशा फरकाने सामना जिंकला. अांद्रे कैरीलाे (१८ वा मि) अाणि कर्णधार पाअाेलाे गुरेराेने (५० वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला. या गाेलच्या बळावर पेरूने सामन्यात माेठा विजय नाेंदवला. यासह पेरूने यंदाच्या विश्वचषकातील अापला शेवटही गाेड केला. लक्षवेधी कामगिरी करणारा पेरूचा कैरीलाे हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मात्र, याच लाजिरवाण्या पराभवाने अाॅस्ट्रेलियाचे अंतिम १६ मधील प्रवेशाचे स्वप्न भंगले. 


हा रंगतदार सामना पाहण्यासाठी साेचीतील स्टेडियममध्ये खासकरून ४४ हजार ७३ चाहत्यांनी हजेरी लावली हाेती. याच प्रेक्षकांसमाेर लक्षवेधी कामगिरी करताना पेरूने सामन्यात बाजी मारली. याशिवाय शेवटच्या मिनिटापर्यंत सामन्यावरची अापली पकडही कायम ठेवली. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला शेवटपर्यंत समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. यातूनच या टीमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. 


फ्रान्सला राेखून डेन्मार्कही अंतिम १६ मध्ये 
डेन्मार्कचा अंतिम १६ मधील प्रवेशाचा प्रयत्न यशस्वी ठरला. या संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात फ्रान्स संघाला बराेबरीत राेखले. हा सामना शून्य गाेलने बराेबरीत राहिला. त्यामुळे दाेन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे या गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कचे पाच गुण झाले. यासह डेन्मार्कचा संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरला. 

बातम्या आणखी आहेत...