आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपांत्यपूर्व फेरीत लियाेनेल मेसी-राेनाल्डाेची हाेऊ शकेल लढत; स्पेन व इंग्लंडचा साेपा ड्राॅ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्काे- गत चॅम्पियन जर्मनी संघाला झटपट पॅकअप करावे लागल्याने अाता यंदाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजेता हाेण्यासाठी समीकरण जुळवण्याला सुरुवात झाली. यातूनच माजी विजेत्यांनी अापला दावा केला. दुसरीकडे नवख्या संघांनी याकडे अागेकूच करण्याचे संकेत दिले. त्यामुळेच अाता प्री-क्वार्टर फायनलच्या सामन्यांचा हा टप्पा अधिक रंगतदार हाेण्याचे चित्र अाहे. अाता शनिवारपासून अंतिम १६ मधील सामन्यांना सुरुवात हाेईल. यात एकूण ३२ पैकी १६ संघांनी धडक मारली. यामध्ये युराेपातील सर्वाधिक १० संघांचा समावेश अाहे. तसेच चार संघ दक्षिण अमेरिका, प्रत्येकी एक अाशिया अाणि उत्तर अमेरिकेचा अाहे. अाता या फेरीच्या दरम्यान हाेणाऱ्या लढतीमुळे अागामी अंतिम ८ मध्ये क्रिस्टियानाे राेनाल्डाे अाणि लियाेनेल मेसी समाेरासमाेर येण्याची शक्यता अाहे. पाेर्तुगाल अाणि अर्जेंटिनामध्ये उपांत्यपूर्व सामना हाेण्याची शक्यता अाहे.    


शनिवारी चार बलाढ्य संघांतील सामन्याने हाेणार अाहे. त्यामुळे सुरुवातीचे हे दाेन्ही सामने हाय हाेल्टेज मानले जात अाहेत. लियाेनेल मेसीचा सामना अाता ग्रिजमॅनशी हाेईल. अर्जेंटिना अाणि फ्रान्स यांच्यात सामना रंगणार अाहे.      


सहा माजी चॅम्पियन : अंतिम १६ मध्ये एकूण १६ संघांनी प्रवेश केला. यात सहा माजी चॅम्पियन संघांचा समावेश अाहे. यात दाेन वेळच्या विजेत्या उरुग्वे, पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना अाणि इंग्लंड संघ सहभागी अाहेत. त्यामुळे या सहा संघांतील सामने हे चाहत्यांसाठी माेठी पर्वणीच ठरणार अाहे.   

 
इंग्लंड, स्पेनला जेतेपदाची माेठी संधी
इंग्लंड अाणि स्पेन संघाला यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठण्याची माेठी संधी अाहे. मात्र, त्यासाठी या दाेन्ही संघांना काहीसे अडसर यशस्वीपणे दूर करावे लागतील. या दाेन्ही संघांसाठी पुढच्या फेरीतील ड्राॅ साेपा अाहे. इंग्लंडचा सामना अाता काेलंबियाशी हाेईल. यातील विजयाने इंग्लंडचा पुढचा सामना स्वित्झर्लंड अाणि स्वीडन यांच्याताील विजेत्या टीमशी हाेऊ शकेल.  दुसरीकडे स्पेनलाही असाच साेपा मार्ग अाहे. स्पेनसमाेरही नवखे संघ असतील. 


त्यामुळे हाेईल कारवाई 
फिफाच्या नियमानुसार क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी खेळाडूला दाेन वेळा यलाे कार्ड दाखवण्यात अाले, तर त्याच खेळाडूला  पुढच्या फेरीत कार्ड मिळाले. तर त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई हाेऊ शकेल. म्हणजेच अंतिम अाठमधील सामन्यादरम्यानच्या गैरवर्तनाने या खेळाडूंना उपांत्य सामन्याला मुकावे लागेल.


मेसी, राेनाल्डाे, नेमारवर निलंबनाची टांगती तलवार   
पुढच्या फेरीतील प्रवेशासाठी सध्या अर्जेंटिना, पाेर्तुगाल अाणि ब्राझील संघाचे प्रशिक्षक डावपेच अाखत अाहेत.मात्र, दुसरीकडे या तिन्ही टीमच्या हुकमी एक्क्यावर अाता वेगळेच संकट अाेढावण्याचे चित्र अाहे. अर्जेंटिनाच्या मेसी, पाेर्तुगालच्या राेनाल्डाे अाणि ब्राझीलच्या नेमावर अाता सेमीफायनलपूर्वीच निलंबन हाेण्याची टांगती तलवार अाहे. कारण, या तिन्ही खेळाडूंना अातापर्यंत प्रत्येकी दाेन वेळा यलाे कार्ड दाखवण्यात अाले. त्यामुळेच अाता पुढच्या सामन्यातील गैरवर्तन या तिन्ही खेळाडूंच्या अंगलट येण्याची शक्यता अाहे. मेसीला नायजेरिया अाणि फ्रान्सविरुद्ध सामन्यादरम्यान हे कार्ड दाखवण्यात अाले. तसेच राेनाल्डाेलाही दाेन वेळचे गैरवर्तन महागात पडले.

बातम्या आणखी आहेत...