आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी विश्वविजेत्या उरुग्वेसमाेर अाज एम्बापेचे अाव्हान; ब्राझीलला राे‌खण्यास बेल्जियम सज्ज!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निज्नि नाेवाेग्राेड- सुअारेेझचा दाेन वेळचा विश्वविजेता उरुग्वे संघ अाता फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी टीमने दाेन दिवस कसून मेहनत घेतली. दरम्यान, या फेरीचा उरुग्वे टीमचा प्रवास काहीसा खडतर अाहे. या टीमसमाेर अंतिम अाठमध्ये १९ वर्षीय एम्बापेचे तगडे अाव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नाेवाग्राेदच्या मैदानावर शुक्रवारी फ्रान्स अाणि उरुग्वेचे संघ समाेरासमाेर असतील. यातील विजयाच्या बळावर अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करण्याचा दाेन्ही संघांचा प्रयत्न असे. बचावात्मक खेळीच्या बळावर हा सामना जिंकण्याचा दाेन्ही संघांचा मानस अाहे. 


दुसरीकडे पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाला राेखण्यसाठी लुकाकुच्या बेल्जियम संघाने कंबर कसली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला बेल्जियम संघ अाता उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी सज्ज झाला अाहे. या दाेन्ही बलाढ्य संघांचा सामना शुक्रवारी मध्यरात्री रंगणार अाहे. नेमारच्या ब्राझील संघाने पुढच्या फेरीतील प्रवेशासाठी कसून सराव केला. 


चाहत्यांसाठी माेठी पर्वणी
शुक्रवारी विश्वचषकातील दाेन उपांत्यपूर्व फेरीचे सामने हाेणार अाहे. या दाेन्ही सामन्यात बलाढ्य संघ अापले नशिब अाजमावतील. त्यामुळे या संघांतील झंुज पाहण्याची चाहत्यांना माेठी पर्वणी अाहे. पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील संघ अापले अाव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरणार अाहे. दुसरीकडे तिसऱ्या किताबाच्या अापले माेहिमेला फत्ते करण्यासाठी प्रयत्नशील असलेला उरुग्वे संघही पुढच्या फेरीतील प्रवेशासाठी सज्ज झालेला अाहे. तसेच फ्रान्स अाणि बेल्जियम संघही अापापल्या गटातील सामने जिंकण्यासाठी कंबर कसून अाहेत. यातूनच चाहत्यांना या दाेन सामन्यांत जागतिक स्तरावरील सुपरस्टार नेमार, लुकाकु, एम्बापे अाणि एडन हझार्डची राेमांचक खेळी पहायला मिळणार अाहे. जगभरातील काेट्यवधी चाहत्यांची नजर निकालाकडे लागली अाहे. 

 

सातव्यांदा उपांत्य फेरी प्रवेशास ब्राझील उत्सुक 
पाच वेळचा विश्वविजेता ब्राझील संघ अाता सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, यासाठी ब्राझीलच्या टीमला 'गाेल्डन जनरेशन' मानल्या जाणाऱ्या बेल्जियमचे तगडे अाव्हान असेल. त्यामुळे ब्राझीलच्या संघाला विजयासााठी अाज सामन्यात माेठी मेहनत घ्यावी लागेल. मात्र, मागील इितहासावर नजर टाकली तर ब्राझीलचे पारडे जड मानले जाते. ब्राझील संघ ५५ वर्षांपासून पराभूत झालेला नाही. अातापर्यंत या दाेन्ही संघांत एकूण चार सामने झालेे. यातील तीन सामन्यांत ब्राझीलने विजयश्री खेचून अाणली. तर, एकाच लढतीत बेल्जियम विजयी झाला. या संघात १९६३ मध्ये पहिला सामना रंगला हाेता. यात बेल्जियम संघाने बाजी मारली हाेती. या संघाने ५-१ ने हा सामना जिंकला हाेता. 


एम्बापेचा फाॅर्म व कवानीच्या फिटनेसवर फ्रान्सची मदार 
सध्या फ्रान्सचा १९ वर्षीय स्ट्रायकर किलियन एम्बापे हा फाॅर्मात अाहे. त्याची गत सामन्यातील कामगिरीही वाखण्याजाेगी ठरली. फ्रान्सला पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित करता अाला. त्यामुळेच अर्जेटिना संघ बाहेर पडला. उरुग्वेविरुद्ध अशी लक्षवेधी कामगिरी करण्याचा एम्बापेचा प्रयत्न असेल. त्याचा फाॅर्म कायम राहिल्यास फ्रान्सला अंतिम चारमध्ये प्रवेश करता येईल. 


नेमारवर अद्यापही सवाट! 
सुपरस्टार राेनाल्डाे, लियाेनेल मेसी हे दाेघेही अापापल्या संघांसह यंदाच्या विश्वचषकातून बाहेर पडले. नेमारही याच सुपरस्टारपैकी अाहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील अाव्हान कायम ठेवण्यासाठी करसत करावी लागेल. ब्राझीलच्या समाेर बेल्जियमचा संघ अाहे. 


फ्रान्स -उरुग्वे, ५२ वर्षांत सात सामने, चार ड्राॅ 
अातापर्यंत मागील ५२ वर्षांत फ्रान्स अाणि उरुग्वे यांच्यात केवळ सहा-सात सामने झाले अाहेत. यातील दाेन सामन्यांत उरुग्वेने विजयी पताका फडकवली. तर, एकाच सामन्यात फ्रान्सला विजयाची नाेंद करता अाली. या दाेन्ही संघातील चार सामने बराेबरीत राहिले. सात सामन्यांत या दाेन्ही संघांनी केवळ सहा गाेल केले अाहेत. त्यामुळे संघातील सामना कंटाळवाणा मानला जात अाहे. 


उरुग्वेची मदार सुअारेझवर 
दाेन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वे संघाच्या विजयाची मदार ही लुईस सुअारेझवर असेल. तसेच एडिसन कवानीकडूनही संघाला माेठ्या खेळीची अाशा अाहे. हे दाेन्ही खेळाडू अापल्या बचावात्मक शैलीदार खेळीच्या अाधारे अापल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...