आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA World Cup: पहिल्या २ उपांत्यपूर्व लढती उद्या; एक टीम ५० वर्षांनी पहिल्यांदा खेळणार फायनल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- इंग्लंडच्या कोलंबियावर विजयासह विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीचे प्रतिस्पर्धी निश्चित झाले आहेत. इंग्लंड टीम आता अंतिम आठमध्ये स्वीडनशी भिडणार आहे. याच दिवशी यजमान रशिया आणि क्रोएशिया समोरासमोर असतील. दोन इतर उपांत्यपूर्व लढतींत फ्रान्स वि. उरुग्वे आणि ब्राझील वि. बेल्जियम यांच्या लढत होईल. 

 
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या आठ संघांपैकी चार टीम ब्राझील, उरुग्वे, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी विजेतेपद मिळवले आहे. दुसरीकडे बेल्जियम, स्वीडन, रशिया आणि क्रोएशिया या टीम चॅम्पियन बनलेल्या नाहीत. या चारपैकी एक  टीम पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचेल. उपांत्य फेरीत ब्राझील, बेल्जियम, उरुग्वे आणि फ्रान्स यांच्यातील एक टीम फायनल खेळेल. दुसरीकडे इंग्लंड, स्वीडन, रशिया आणि क्रोएशिया यातील एक संघ असेल. या चारपैकी इंग्लंड १९६६ मध्ये चॅम्पियन बनला आहे. इंग्लंड फायनलमध्ये पोहोचल्यास ५२ वर्षांनी किताबाची लढत खेळेल.


जगाला मिळू शकते नवी फुटबॉल टीम चॅम्पियन 
बेल्जियम आपल्या गटात ब्राझील व त्यानंतर फ्रान्स किंवा उरुग्वेला पराभूत केल्यास तो फायनल खेळेल. जर असे झाले तर ती टीम पहिल्यांदा फायनलमध्ये खेळणार आहे.  उपांत्य फेरीत इंग्लंड पराभूत झाल्यास त्या गटातील स्वीडन, रशिया, क्रोएशियापैकी एक टीम पहिल्यांदा फायनलमध्ये खेळेल. 


बाद फेरीच्या ८ सामन्या पैकी तीन टीमचा पेनल्टीवर विजय  
आतापर्यंत आठ बाद फेरीचे सामने झाले आहेत. त्यापैकी तीन सामन्यांचा निकाल पेनल्टी शूट आऊटवर लागला आहे. यजमान रशिया, क्रोएशिया, इंग्लंड या तीन संघांनी पेनल्टी शूटआऊटवर मात केली. रशियाने स्पेनला, क्रोएशियाने डेन्मार्कला आणि इंग्लंड टीमने कोलंबिया टीमला हरवले. 


रशियाने आपल्यापेक्षा अव्वल रँकिंगच्या टीमला हरवले 
विश्वचषकात यंदा विश्वविजेता आणि नंबर वन टीम जर्मनी पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर झाली. दुसरीकडे सर्वात तळातील टीम रशियाने (७०) चारपैकी ३ सामने जिंकले. त्यांनी तिन्ही जिंकलेल्या लढतींत आपल्यापेक्षा चांगली रँकिंग असलेल्या टीमला पराभूत केले अाहे. स्वीडन टीमनेदेखील धक्कादायक निकाल नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...