आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाॅस्काे- यजमान रशियाने घरच्या मैदानावर एेतिहासिक विजयासह फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यजमानांनी रविवारी नाॅकअाऊटच्या सामन्यात २०१० च्या विश्वविजेत्या स्पेनवर सनसनाटी विजयाची नाेंद केली. जागतिक क्रमवारीत ७० व्या स्थानावर असलेल्या रशियाने पेनल्टी शूटअाऊटमध्ये ४-३ ने सामना जिंकला. रशियाने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला.
गाेलरक्षक इगाेरच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर यजमान रशियाने विजयश्री खेचून अाणली. त्याने स्पेनच्या काेके अाणि अस्पासचा गाेल राेखून अापल्या टीमचा विजय निश्चित केला. यामुळे रशियाला विजयाची नाेेंद करता अाली.
निर्धारित वेळेपर्यंत ही लढत १-१ ने बराेबरीत हाेती. त्यानंतरही अतिरिक्त वेळेत ही लढत बराेबरीतच राहिली. अखेर निकालासाठी पेनल्टी शूटअाऊटचा अाधार घेण्यात अाला. यामध्ये यजमान रशियाचा संघ वरचढ ठरला. संघातील स्माेलाेव, इग्नाशेविक, गाेलाेविन अाणि चेरीशेवने पेनल्टीवर राेमहर्षक गाेल केले.यामुळे रशियाचा संघ विजयी झाला.
काेके, अस्पासच्या अपयशाने स्पेनचे पॅकअप
पेनल्टी शूटअाऊटमध्ये स्पेनला पहिली संधी मिळाली. त्यानुसार अनुभवी फुटबाॅलपटू इनिस्ताने गाेल करून स्पेनला अाघाडी मिळवून दिली. तसेच पिक्युनेही गाेल केला. मात्र, तिसऱ्या संधीदरम्यान काेके अपयशी ठरला. त्यानंतर रशियाने ३-२ ने अाघाडी घेतली. राेमासच्या गाेलने स्पेनला बराेबरी साधता अाली. शेवटच्या संधीत अस्पास अपयशी ठरला.
२४ तासांत माेठा पराभव
अवघ्या २४ तासांत यंदाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत तीन बलाढ्य संघांना अनपेक्षित पराभवाने पॅकअप करावे लागले. यात लियाेेनेल मेसीच्या अर्जेंटिना, राेनाल्डाेच्या पाेर्तुगाल अाणि अाता डिएगाे काेस्टाच्या स्पेनचा समावेश अाहे. किताबाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे हे तिन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले.
पाचव्यांदा यजमान विजयी
पेनल्टी शूटअाऊटमध्ये बाजी मारणारा रशिया हा अातापर्यंतच्या इतिहासातील पाचवा यजमान संघ ठरला. यापूर्वी चार यजमानांनी अशा परिस्थितीत विजयाची नाेंद कली.
वर्ल्डकपमधील २७ व्या पेनल्टी शूटअाऊटची नोंद
स्पेन अाणि रशियाचा सामना पेनल्टी शूटअाऊटमध्ये रंगला. हा विश्वचषकाच्या इतिहासातील २७ वी पेनल्टी शूटअाऊट ठरला. तसेच यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदा याची नाेंद करण्यात अाली अाहे.
स्पेनने रशियाच्या तुलनेत केले अधिक पास
टीम | गोलचे प्रयत्न | कॉर्नर | बॉल पझेशन | पास | पास अॅक्यूरेसी | येलो कार्ड |
स्पेन | 25 | 6 | 74% | 1137 | 91% | 1 |
रूस | 6 | 5 | 26% | 285 | 71% |
2 |
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.