आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसीचा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिला गाेल; नायजेरिया बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समारा- सलगच्या अपयशातून सावरताना लियाेनेल मेसीने दमदार पुरागमन करताना अर्जेटिनाला २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या नाॅकअाऊटचे तिकीट मिळवून दिले. त्याने अापल्या अचुक गाेलच्या बळावर अर्जेटिनाचा विजय निश्चित केला. या गाेलच्या बळावर अर्जेटिना संघाने डी गटातील तिसऱ्या अाणि करा वा मरा असलेला सामना जिंकला. अर्जेटिनाने मंगळवारी मध्यरात्री नायजेरियाचा पराभव केला. अर्जेटिनाने २-१ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह अर्जेटिनाने स्पर्धेत पहिल्या विजयाची नाेंद केली. अर्जेटिना अाता ५ गुणांसह दुसऱ्या स्थानी दाखल झाला. 


१३ व्या प्रयत्नात मेसीचा पहिला गाेल 
जागतिक स्तरावरच्या सुपरस्टार लियाेनेल मेसीला यंदाच्या विश्वचषकात गाेलचे खाते उघडण्यासाठी माेठी कसरत घ्यावी लागली. मात्र, अापल्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवताना त्याने अखेर गाेलची नाेंद केली. त्याने यंदाच्या विश्वचषकात १३ व्या प्रयत्नात पहिला गाेल केला. त्याला नायजेरियाविरुद्ध हे यश गवसले. त्याने सामन्याच्या १४ व्या मिनिटाला सुरेख पासिंगच्या अाधारे नायजेरियाच्या गाेलरक्षक फ्रान्सिसला हुलकावणी देत गाेल केला. त्याचा यंदाच्या स्पर्धेतील पहिला गाेल ठरला. 


क्राेएशिया विजयी; अर्जेंटिनाला संधी 
डी गटातील तिसऱ्या सामन्यात क्राेएशियाने अापले वर्चस्व अबाधित ठेवताना बाजी मारली. या संघाने मंगळवारी सामन्यात अाइसलँडचा पराभव केला. क्राेएशियाने २-१ ने सामना जिंकला. बाडेलजे (५३ वा मि.) अाणि पेरीसिक (९० वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून क्राेएशियाला विजय मिळवून दिला. हा क्राेएशियाचा गटातील सलग तिसरा विजय ठरला. यामुळे या टीमचे गटात ९ गुण झाले अाहेत. क्राेेएशियाने यापूर्वीच अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित केला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...