आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरुग्वेची प्रथमच गटात विजयी हॅट‌्ट्रिक, ३-० ने जिंकला तिसरा सामना; सुअारेझने केला एक गाेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समारा- दाेन वेळच्या चॅम्पियन उरुग्वेने सलग तिसऱ्या सामन्यात बाजी मारून िवश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजयी हॅटट्रिक नाेंदवली. यासह उरुग्वेने अापला किताबाचा दावा मजबूत केला. जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या उरुग्वेने अ गटातील अापल्या तिसऱ्या सामन्यात यजमान रशियाचा पराभव केला. उरुग्वेने ३-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. लुईस सुअारेझ (१० वा मि.) अाणि एडिसन कवानीने (९० वा मि.) यांनी गाेल करून उरुग्वेचा विजय निश्चित केला. रशियाच्या चेरीसेवनेही प्रतिस्पर्धी उरुग्वेच्या विजयात माेलाचे एका गाेलचे याेगदान दिले. त्याने २३ व्या मिनिटाला अात्मघाती गाेल करून उरुग्वेची अाघाडी मजबूत केली हाेती. सुरेख गाेल करणारा सुअारेझ हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात दहाव्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले. 


या संघाने अापल्या वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच गटात विजयाची हॅटट्रिक केली. यासह उरुग्वेने गटात ९ गुणांसह अापले अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे पराभवामुळे रशियाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. रशियाच्या यंदाच्या स्पर्धेतील हा पहिला पराभव ठरला. रशियाने सलगच्या दाेन विजयांच्या बळावर गटात अव्वल स्थान गाठले हाेते. सलगच्या विजयाने या दाेन्ही संघांनी अंतिम १६ मधील अापला प्रवेश निश्चित केला अाहे. 


इगाेर स्माेलनिकाेवला रेडकार्ड 
यजमान रशियाच्या इगाेर स्माेलनिकाेवला सामन्यातील गैरवर्तन महागात पडले. कारण, याच कारणामुळे त्याला सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला दाेन वेळा यलाे कार्ड दाखवण्यात अाले. मात्र, त्यानंतरही काेणत्याही प्रकारच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. यातूनच त्याला सामन्यात रेड कार्ड दाखवण्यात अाले. 


कवानीचा तिसऱ्या वर्ल्डकपमध्ये गाेल
उरुग्वे संघाच्या एडिसन कवानीने सामन्यात शानदार गाेल केला. त्याचा हा करिअरमधील तिसऱ्या वर्ल्डकपचा गाेल ठरला. यापूर्वीही त्याने दाेन विश्वचषकांत अापल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले अाहे. 


साैदी अरेबिया विजयी; इजिप्तवर केली २-१ ने मात 
सलमान अल फराज (४५+६ वा मि.) अाणि सालेम अल दावासरी (९०+५ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून साैदी अरेबियाला विश्वचषकात विजय मिळवून दिला. या गाेलच्या बळावर साैदी अरेबियाने अ गटातील अापल्या तिसऱ्या सामन्यात इजिप्तचा पराभव केला. या संघाने २-१ अशा फरकाने विजय संपादन केला. इजिप्तसाठी माे. सालेहने २२ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. यानंतरही या टीमला पुढची फेरी गाठता अाली नाही. हे दाेन्ही संघ बाहेर झाले. 

बातम्या आणखी आहेत...