आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक फुटबॉल : क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जोरावर पोर्तुगाल संघाच्या अाशा कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या शानदार शैलीत हेडरद्वारे गोल करताना पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो. - Divya Marathi
आपल्या शानदार शैलीत हेडरद्वारे गोल करताना पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो.

मॉस्को- जगातील स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डोने हेडरच्या जबरदस्त गोलच्या बळावर पोर्तुगाल टीमने बुधवारी मोरोक्कोला ब गटातील सामन्यात १-० गोलने पराभूत करत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पहिला विजय मिळवला. पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. पोर्तुगालने स्पेनविरुद्ध ३-३ ने बरोबरी साधल्यानंतर मोरोक्कोला १-० ने हरवले. त्याचे आता ४ गुण झाले आहेत. पोर्तुगालने स्पर्धेत आतापर्यंत केलेले चारही गोल रोनाल्डोच्या खात्यातील आहेत. त्याने स्पेनविरुद्ध ३ गोल केले होते. 


रोनाल्डोने सामन्याच्या चौथ्या मिनिटाला हेडरने गोल करत आपल्या पोर्तुगाल टीमला १-० गोलने आघाडीवर नेले. ती आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. मोरोक्कोला पोर्तुगालच्या धोकादायक स्ट्रायकरला रोखण्यात अपयशी ठरल्याचे दुःख कायम राहील. दुसऱ्या हाफमध्ये अनेक संधी गमावल्याने ते निराश होतील. उत्तर आफ्रिकन टीम मोरोक्कोने विश्वचषकासाठी सहा सामन्यांत एकही गोल न होता पात्रता मिळवली होती. इराणविरुद्ध त्यांनी इंज्युरी वेळेत आत्मघाती गोल केला आणि चौथ्या मिनिटात पोर्तुगालला गोल करण्याची संधी दिली. संघाला थेट स्पर्धेबाहेर व्हावे लागले. 


मोरोक्कोचे आव्हान संपुष्टात 
इराणकडून आपला पहिला सामना आत्मघाती गोलमुळे गमावलेल्या मोरोक्को टीमने दुसऱ्या हाफमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. मात्र, अथक प्रयत्नांनंतरही त्यांना गोल करता आला नाही. मोरोक्कोने अनेक मोक्याच्या संधी गमावल्या, त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मोरोक्को स्पर्धेतून बाहेर होणारी पहिली टीम ठरली आहे. 


रोनाल्डोचे विश्वचषकात झाले एकूण ७ गोल 
स्टार स्ट्रायकर रोनाल्डोचे विश्वचषकात एकूण ७ गोल झाले आहेत. त्याने गेल्या तीन विश्वचषकांत प्रत्येक १-१ गोल केले होते. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात ४ गोल करत रोनाल्डो पोर्तुगालकडून एका विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी पोहोचला. पोर्तुगालच्या युसेबियाने १९६६ मध्ये विश्वचषकात एकूण ९ गोल केले होते. रोनाल्डोने ८५ वा आंतरराष्ट्रीय गोल केला. तो आता हंगेरीच्या फेरेंक पुस्कासच्या युरोपियन विक्रमाच्या पुढे गेला आहे. 

 


सुआरेजचा गोल, उरुग्वे बाद फेरीत 
दाेन वेळेचा माजी चॅम्पियन उरुग्वेने आपला स्टार खेळाडू लुईस सुआरेजच्या गोलच्या बळावर बुधवारी रात्री सौदी अरबवर १-० गोलने शानदार विजय मिळवला. फिफा विश्वचषकात आपला १०० वा सामना खेळत असलेल्या सुआरेजने एकमेव गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत आपल्या उरुग्वे संघाला बाद फेरीत पोहोचवले. 


उरुग्वेने पहिल्या सामन्यात १-० ने इजिप्तला मात दिली होती. आता दुसऱ्या सामन्यात सौदी अरबला १-० ने पराभूत करत सलग दुसरा विजय नोंदवला. आपल्या अ गटात यजमान रशियाने सलग दोन विजयांसह बाद फेरीत यापूर्वी प्रवेश केला आहे. इजिप्त व सौदी अरब आपले दोन्ही सामने गमावत स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. दोन वेळेचा चॅम्पियन उरुग्वेने पहिल्यांदा सौदी अरबला पराभूत केले आहे. सौदी अरबने २००२ मध्ये उरुग्वेविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना जिंकला होता. दुसरीकडे २०१४ मध्ये या दोघांतील मैत्रीपूर्ण सामना बरोबरीत राहिला. 

बातम्या आणखी आहेत...