आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेल्जियमविरुद्ध तिसऱ्यांदा खेळणार फ्रान्स, आधीच्या दोन्ही लढतींत फ्रान्सचाच विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट पीटर्सबर्ग- पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलला बाहेर पाठवणारा बेल्जियम संघाचे मनोर्धेय उंचावलेले आहे. बेल्जियमसमाेर मंगळवारी उपांत्य सामन्यात माजी विश्वविजेत्या फ्रान्सचे तगडे अाव्हान असेल. फ्रान्स सहाव्यांदा आणि बेल्जियम दुसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये दाखल झाले आहेत. हे दोन्ही संघ पहिल्या फुटबॉल विश्वचषकापासून (१९३०) स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. मात्र त्यांच्यात समोरासमोर फक्त दोन वेळा लढत झाली आहे. उभय संघ १९३८ आणि १९८६ मध्ये समोरासमोर आले होते. या दोन्ही सामन्यांत फ्रान्सचाच विजय झाला होता. 


नुकत्याच झालेल्या अंतिम अाठच्या सामन्यात अापली क्षमता सिद्ध करताना या दाेन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे हे दाेन्ही संघ जबरदस्त फाॅर्मात अाहेत. हीच लय पाहता विजयाचा निश्चित अशा प्रकारचा अंदाज बांधणेही कठीण मानले जाते. कारण, उपांत्यपूर्व फेरीतील या दाेन्ही संघांची कामगिरी लक्षवेधी ठरली अाहे. त्यामुळे या दाेन्ही संघांतील ही लढत अधिक राेमांचक हाेण्याचे चित्र अाहे. यातील विजयाने किताबाचा दावेदार समाेर येणार असल्याचे तज्ञांचे मत अाहे. 


ब्राझीलविरुद्धच्या विजयाने बेल्जियम टीमच्या खेळाडूंचा अात्मविश्वास दुणावला अाहे. अाता पुन्हा एकदा बलाढ्य संघाविरुद्ध चमत्कारिक खेळीचा बेल्जियमचा प्रयत्न असेल. 

 

बेल्जियमचे १४ गाेल
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने यंदाच्या पाच सामन्यांत १४ गाेल केले अाहेत. टीमची क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलविरुद्धची कामगिरी अधिक लक्षवेधी ठरली. यात बेल्जियमने २-१ ने विजयश्री खेचून अाणली.


माजी विजेत्या फ्रान्स संघाची काय अाहे दावेदारी 
- सहाव्यांदा फ्रान्सने उपांत्य फेरी गाठली. हा संघ १९९८ अाणि २००६ च्या अंतिम फेरीत खेळला अाहे. फ्रान्सचा संघ हा १९९८ मध्ये विश्वविजेता ठरला. 
- फ्रान्स टीमने स्पर्धेत टार्गेटवर सहा वेळा हल्ला केला. या यशस्वी खेळीने टीमला ६ गाेल करता अाले. त्यामुळे विश्वचषकातील ही खेळी सरस ठरली. 
- ग्रीजॅमन, एम्बापेमुळे संघ वरचढ. ग्रीजमॅनचे मेजर स्पर्धेच्या सहा सामन्यांत ७ गाेल. एम्बापे पेलेनंतर (१९५८) विश्वचषकात ३ गाेल करणारा युवा फुटबाॅलपटू अाहे. 


बेल्जियम संघाचे का मानले जाते पारडे जड! 
- बेल्जियमची टीम गत २३ सामन्यांत विजयी ठरली. या संघाचा शेवटचा पराभव २०१६ युराेमध्ये वेल्सविरुद्ध झाला. त्यामुळे ही लय कायम ठेवण्याचा टीमचा प्रयत्न असेल. 
- राेमेलू लुकाकूने बेल्जियमच्या गत १३ सामन्यांत २० गाेल केले अाहेत. यातील १७ गाेल स्वत: केले. ३ गाेलसाठी असिस्ट केले. यासाठीचे याेगदान सरस ठरले. 
- एडेन हेझार्डने संघाच्या गत १४ सामन्यांत १४ गाेलचे याेगदान दिले. त्याने सहा गाेलसाठी मदत केली. टीमचे ९ गाेल स्काेअरर. म्हणजे अधिक खेळाडू गाेलसाठी सक्षम अाहेत. 


फ्रान्सवर सर्वांची नजर 
फ्रान्स संघाने विश्वचषकात चमकदार कामगिरी करताना अापल्याकडे लक्ष वेधून घेतले. या टीमने लियाेनेल मेसीच्या अर्जेंटिनाचा पराभव केला. यात फ्रान्सने ४-३ अशा फरकाने विजयाची नाेंद केली हाेती. हीच लय कायम ठेवताना फ्रान्सने अंतिम अाठच्या सामन्यात सुअारेझच्या उरुग्वेचा पराभव केला. त्यामुळे १९९८ च्या विश्वविजेत्या फ्रान्सचा अाजच्या उपांत्य सामन्यात विजयाचा दावा मजबूत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...