आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी मालिका; भारतीय महिलांचा दक्षिण काेरियावर मालिका विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेल- राणीच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेल्या भारतीय महिलांनी शुक्रवारी यजमान दक्षिण काेरिया टीमवर मालिका विजयाची नाेंद केली. भारतीय महिला हाॅकी टीमने मालिकेतील चाैथ्या सामन्यात काेरियाला धूळ चारली. भारताने ३-१ ने अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. गुरजीत काैर (२ रा मि.), दीपिका (१४ वा मि.) अाणि पूनम राणी (४७ वा मि.) यांनी प्रत्येकी एका गाेलच्या बळावर भारताला शानदार विजय मिळवून दिला.  काेरियाकडून ५७ व्या मिनिटाला हियून पार्कने अापल्या घरच्या मैदानावर गाेल केला. मात्र, या टीमचा सामन्यातील हा एकमेव गाेल ठरला.  त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारतीय महिलांनी यजमानांविरुद्धच्या पाच हाॅकी सामन्यांच्या मालिकेमध्ये ३-१ ने विजयी अाघाडी घेतली. अाता मालिकेतील पाचव्या अाणि शेवटच्या सामन्यातही बाजी मारण्याचा भारताचा मानस अाहे.   

मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या भारतीय महिलांनी दाेन मिनिटांमध्ये सामन्यात अाघाडी घेतली. पहिल्या क्वार्टरमध्ये गुरजीतने  गाेल केला. त्यानंतर १२ मिनिटांमध्ये दीपिकाने भारताच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. त्यामुळे टीमचा दबदबा निर्माण झाला.  


दरम्यान, पिछाडीवर पडलेल्या काेरियाने सामन्यात गाेलचे खाते उघडण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले. मात्र, भारताच्या खेळाडूंनी हे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर ४७ व्या मिनिटांला पूनम राणीने गाेल केला अाणि भारताचा एकतर्फी विजय निश्चित केला. काेरियाने ५७ व्या मिनिटांला एकमेव गाेल केला. काेरियाच्या हियूनला हे यश मिळाले. मात्र, तिला टीमचा पराभव टाळता अाला नाही. 

 

इपाेह: भारतीय पुरुष टीमचा पराभव

पाच वेळच्या चॅम्पियन भारतीय संघाला शुक्रवारी अझलन शाह चषक हाॅकी स्पर्धेतील सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले.   अायर्लंडने ३-२ अशा फरकाने सामना जिंकला.  डाेनाेघुए (२४ वा मि.), मुरे (३६ वा मि.) अाणि काेल (४२ वा मि.) यांनी अायर्लंडला विजय मिळवून दिला.  भारताकडून रमणदीप (१० वा मि.), अमित राेहिदास (२६ वा मि.) यांनी गाेल केले. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही.  पाचव्या स्थानासाठी झंुजणार : भारताला अाता पाचव्या स्थानासाठी झंुज द्यावी लागेल. यासाठीचा भारताचा सामना शनिवारी अायर्लंड टीमशी हाेईल. हे दाेन्ही संघ पुन्हा एकदा पाचव्या स्थानासाठीच्या लढतीमध्ये समाेरासमाेर असतील.

बातम्या आणखी आहेत...