Home | Sports | Other Sports | Hockey Series: India's winning hat-trick

हाॅकी मालिका : भारताची विजयी हॅट््ट्रिक; न्यूझीलंडचा उडाला धुव्वा

वृत्तसंस्था | Update - Jul 23, 2018, 07:38 AM IST

अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाने घरच्या मैदानावरील हाॅकी मालिकेत विजयाची हॅटट्रिक नाेंदवली.

  • Hockey Series: India's winning hat-trick

    बंगळुरू- अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाने घरच्या मैदानावरील हाॅकी मालिकेत विजयाची हॅटट्रिक नाेंदवली. यजमान भारताने रविवारी पाहुण्या न्यूझीलंड संघाचा तिसऱ्या अाणि शेवटच्या सामन्यात पराभव केला. भारताने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. रुपिंदर पाल सिंग (८ वा मि.), सुरेंदर कुमार (१५ वा मि.), मनदीप सिंग (४४ वा मि.) अाणि अाकाशदीप सिंग (६० वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडच्या खेळाडूंना शेवटपर्यंत सामन्यात एकही गाेल करता अाला नाही. यातूनच या पाहुण्या टीमला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.या सलग तिसऱ्या विजयाच्या बळावर भारताने तीन हाॅकी सामन्यांची मालिका ३-० ने अापल्या नावे केली. याशिवाय भारताने उल्लेखनिय कामगिरी करताना जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड संघाचा मालिकेत धुव्वा उडवला.


    सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारताने अाठव्या मिनिटाला सामन्यावरची अापली पकड अधिक मजबुत केली. रुपिंदर पालने भारताकडून गाेलचे खाते उघडले. त्यानंतर सात मिनिटांत सुरेंदरने भारताच्या अाघाडीला २-० ने मजबुत केले. त्यापाठाेपाठ मनदीप अाणि अाकाशदीपने प्रत्येकी एक गाेल केला.


    हाॅकी वर्ल्डकप : इटली, अर्जेंटिनाची अागेकूच
    इटली अाणि अर्जेंटिना संघाने रविवारी महिलांच्या विश्वचषक हाॅकी स्पर्धेत विजयी सलामी दिली. या दाेन्ही संघांनी अापापल्या गटाच्या पहिल्या सामन्यात विजय संपादन केले. इटलीने अ गटातील सलामीच्या सामन्यात चीनचा पराभव केला. इटलीने ३-० ने सामना जिंकला. ब्राकाेनी (१७ वा मि., अाेविएडाे (३२ वा मि.) अाणि रुगेरीने (४५ वा मि.) विजय निश्चित केला. चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गाेल करता अाला नाही.


    अर्जेंटिनाची ६-२ ने स्पेनवर मात
    अर्जेंटिना महिला हाॅकी संघाने ब गटातील पहिल्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली. या संघाने सामन्यात स्पेनवर ६-२ ने मात केली. अाेर्टीझ (१५, २८ वा मि.), जाेंकुनास (८ वा मि.), माेसिका (२२ वा मि.), मेरीनाे (३१ वा मि.) अाणि बारीनुएवाेने (४८ वा मि.) गाेल करून अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला. स्पेनसाठी पेरेझ (४९ वा मि.) अाणि साल्वाटेलाने (३ रा मि.) गाेल केले.

Trending