आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुलसाठी भारताचे 225 सदस्यीय पथक; 8 वर्षांनंतर प्रथमच बास्केटबाॅल टीमला संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- येत्या ४ एप्रिलपासून सुुरू हाेणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या खेळाडूंच्या काेट्यात वाढ करण्यात अाली. त्यामुळे  या स्पर्धेमध्ये भारताचे २२५ सदस्यीय खेळाडूंचे पथक सहभागी हाेईल. दुसरीकडे तब्बल अाठ वर्षांनंतर भारताचा बास्केटबाॅल संघ या स्पर्धेत अापले काैशल्य पणास लावणार अाहे.  


भारतीय अाॅलिम्पिक महासंघ (अायअाेए) अाणि बाॅक्सिंग फेडरेशन अाॅफ इंडियाच्या (बीएफबीअाय) मागणीला अखेर राष्ट्रकुल महासंघाने (सीजीएफ) मान्यता दिली अाहे. बाॅक्सिंग अाणि अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंच्या काेट्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात अाला. ही स्पर्धा ४ ते १५ एप्रिलदरम्यान अाॅस्ट्रेलियातील गाेल्डकाेस्ट येथे रंगणार अाहे. गत २०१४ मध्ये  भारताचे २१५ सदस्यीय पथक झाले हाेते.


अॅथलेटिक्समध्ये ३७ भारतीय

  अॅथलेटिक्स  ३७ खेळाडूंना अाता भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार अाहे. यामध्ये नव्याने पाच भारतीय खेळाडूंचा काेटा वाढला अाहे. यापूर्वी ही संख्या ३२ अशी हाेती. त्यामुळे भारताचे ३२ धावपटू ग्लासगाे राष्ट्रकुलमध्ये सहभागी झाले हाेते. 

 

बास्केटबाॅल टीम खेळणार

सीजीएफच्या निर्णयामुळे अाता भारताच्या बास्केटबाॅल संघाचा स्पर्धेत सहभागाचा मार्ग माेकळा झाला. भारताचा बास्केटबाॅल संघ अाठ वर्षांनंतर या स्पर्धेत खेळणार अाहे.

 

महिला बाॅक्सरला संधी 
मंजुरीमुळे भारताच्या महिला बाॅक्सरला  सहभागाची संधी मिळेल. यापूर्वी भारताचा बाॅक्सिंगमधील १३ चा काेटा कमी करून १० असा केला हाेता. मात्र, फेडरेशनने वाढ करण्याची मागणी धरून ठेवली.  अाता ही संख्या १२ अशी झाली.

बातम्या आणखी आहेत...