आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघ पाचव्या स्थानावर! अझलन शहा चषक हाॅकी स्पर्धा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपाेह- कर्णधार सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अझलन शहा चषक हाॅकी स्पर्धेत पाचवे स्थान गाठले. भारताने शनिवारी पाचव्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात अायर्लंडचा पराभव केला. भारताने ४-१ अशा फरकाने सामना जिंकला. युवा खेळाडू वरूण कुमार (५, ३२ वा मि.), शिलांदा लाक्रा (२८ वा मि.) अाणि गुरकिरत सिंग (३७ वा मि.) यांनी सुरेख खेळीच्या बळावर भारताचा विजय निश्चित केला. अायर्लंडकडून डालेने ४८ व्या मिनिटांला एकमेव गाेलची नाेंद केली. मात्र, त्यालाही टीमचा पराभव टाळता अाला नाही. या पराभवामुळे जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या अायर्लंड टीमला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

 

भारताने यासह अायर्लंडच्या टीमला  गत सामन्यातील पराभवाची परतफेड केली. गत सामन्यात अायर्लंडने भारतावर मात केली हाेती. त्यामुळे भारतीय संघाला पदकांच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. याचा वचपा काढत भारताने अाता अायर्लंडला धूळ चारली. यासह भारताने पाचवे स्थान गाठले अाहे.  

 

 राष्ट्रकुलमध्ये खेळणार 
पाच वेळचा अझलन शहा चषक विजेता भारतीय संघ अाता अागामी राष्ट्रकुल स्पर्धेत अापले काैशल्य पणास लावणार अाहे. ही स्पर्धा  अाॅॅस्ट्रेलियातील गाेल्डकाेस्ट येथे अायाेजित करण्यात अाली.  ४ एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात हाेईल. मलेशियात भारताने राष्ट्रकुलची तयारी पूर्ण केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...