आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू, श्रीकांतची नजर सुपर सिरीजवर; यंदाच्या सत्रात सर्वाधिक किताब जिंकून भारत नंबर वन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली पी. व्ही. सिंधू अाणि के. श्रीकांतची नजर अाता सत्रातील शेवटच्या जागतिक सुपर सिरीजच्या किताबावर लागली अाहे. यासाठी हे दाेघेही बॅडमिंटनपटू सज्ज अाहेत. यंदाच्या सत्रामध्ये युवांनी एकापाठाेपाठ एका अजिंक्यपदकाची कमाई करून भारतीय संघाला नबंर वनचे सिंहासन गाठून दिले. सर्वाधिक ७ किताबाने भारतीय संघ सत्रात अव्वल स्थानावर अाहे. यादरम्यान भारताच्या युवांनी बॅडमिंटनमधील चीन अाणि काेरियाचे अाव्हान पुर्णपणे संपुष्टात अाणले. 


बुधवारपासून सत्रातील शेवटच्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल अाठमध्ये असलेल्या खेळाडूंना सहभागी हाेण्याची संधी असते.  सिंधू अाणि श्रीकांत या दाेघांनीच सत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर या स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केला. 


सध्या सिंधू क्रमवारीत तिसऱ्या अाणि के. श्रीकांत हा पुरुष एकेरीत चाैथ्या स्थानावर अाहे. त्यामुळे हे दाेन्ही खेळाडू स्पर्धेस पात्र ठरले.   सत्रात केलेेल्या चमकदार कामगिरीमुळे सिंधू अाणि के. श्रीकांत जबरदस्त फाॅर्मात अाहेत. सिंधूने रिअाेतील पदकानंतर इंडिया अाेपन अाणि काेरिया अाेपनमध्ये सुपर सिरीजचा किताब पटकावला. त्यापाठाेपाठ ती वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये राैप्यपदकाची मानकरी ठरली. तसेच तिला हाँगकाँग अाेपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.   

> २००७ पासून सुपर सिरीजच्या अायाेजनाला सुरुवात, गत पाच वर्षांपासून भारतीय खेळाडूंचा दबदबा

> यंदा श्रीकांत (४) अाणि साई प्रणीतने (१) जिंकले पुरुष एकेरीचे विजेतेपद

> महिला एकेरीत सिंधूने पटकावली दाेन अजिंक्यपदे

 

 

श्रीकांत पाचव्या सुपर सिरीजसाठी सज्ज 
यंदाच्या सत्रामध्ये सलग चार सुपर सिरीज किताब जिंकून के. श्रीकांत चांगलाच फाॅर्मात अाला अाहे. अाता त्याची नजर सत्रात पाचवी सुपर सिरीज जिंकण्याकडे लागली अाहे. मात्र, यासाठीची त्याची वाट काहीशी खडतर अाहे. त्याचा सलामी सामना नंबर वन व्हिक्टरशी हाेईल. श्रीकांतने सत्रात इंडाेेनेशिया अाेपन, अाॅस्ट्रेलिया अाेपन, डेन्मार्क अाेपन अाणि फ्रेंच अाेपनमध्ये सुपर सिरीज जिंकली अाहे.  

 

 

सिंधूला विजयी सलामीची संधी 
रिअाे अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेत्या सिंधूला या स्पर्धेतील अ गटात दमदार विजयी सलामी देण्याची संधी अाहे. तिचा पहिला सामना बिंगजायाेशी हाेईल. सलामीच्या लढतीमध्ये या दाेघी समाेरासमाेर असतील. सलग किताब जिंकण्याच्या कामगिरीमुळे सिंधूचा अात्मविश्वास दुणावलेला अाहे. त्याचाच फायदा तिला या स्पर्धेत हाेईल. 

 

श्रीकांतचा चाैकार
सत्रात इंडाेेनेशिया अाेपन, अाॅस्ट्रेलिया अाेपन, डेन्मार्क अाेपन अाणि फ्रेंच अाेपन सुपर सिरीज जिंकली.
सिंधू : इंडिया अाेपन, काेरिया अाेपन सुपर सिरीज
बातम्या आणखी आहेत...