आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोल्ड कोस्ट- राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने १७ पदके जिंकली. राष्ट्रकुलच्या इतिहासात भारताने आधी कधीही एकाच दिवसात इतकी पदके जिंकली नव्हती. २०१० मध्ये एकाच दिवशी १५ पदके जिंकली होती. टेबल टेनिस एकेरी व भालाफेकीत प्रथमच सुवर्ण मिळाले. भालाफेकीत नीरज चोपडा, टेबल टेनिसमध्ये मणिका बत्रा, बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, विकास कृष्णन, गौरव सोलंकी, सुमीत व विनेश फोगाटने कुस्तीत, संजीव राजपूतने नेमबाजीत सुवर्ण जिंकले. तसेच भारताने ५ रौप्य, ४ कांस्यपदकेही जिंकली.
- ५ वेळची विश्वविजेती मेरी कोमचे हे पहिलेच राष्ट्रकुल पदक. नवीन जिंदलनंतर आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी ती दुसरीच खासदार आहे.
- भारताने बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक ६, कुस्तीत ४, टेबल टेनिसमध्ये ३ आणि बॅडमिंटन, स्क्वॅश, भालाफेक, नेमबाजीत १-१ पदक पटकावले.
सुवर्णविजेती पूनम यादवला मारहाण
राष्ट्रकुलमध्ये वेटलिफ्टिंग सुवर्णविजेती पूनम यादवला शनिवारी काही जणांनी मारहाण केली. वाराणसीत ही घटना घडली. पूनमला गंभीर दुखापत झाली नाही. जमिनीच्या वादातून हे प्रकरण घडले. कुटंुबीयांचा आराेप आहे की, याच वादामुळे गावातील सरपंचाने समर्थकांसह तिच्यावर हल्ला केला.
पुढील स्लाइडवर पाहा, सुवर्णपदक विजेते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.