आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन वेल्स अाेपन टेनिस स्पर्धा: सेरेनाचा डियासवर विजय; 15 महिन्यांनंतर दमदार पुनरागमन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क- जगातील माजी नंबर वन सेरेना विल्यम्सने १५ महिन्यांनंतर दमदार पुनरागमन करताना इंडियन वेल्स अाेपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. तिने महिला एकेरीच्या सलामीला कझाकिस्तानच्या जरिना डियासला पराभूत केले. सरस खेळी करताना तिने ७-५, ६-३ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह तिने स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. सेरेनाने अापला शेवटचा सामना २०१७ मध्ये अाॅस्ट्रेलियन अाेपनमध्ये खेळला हाेता. त्यानंतर अाता ती प्राेफेशनल टेनिसमध्ये कमबॅक करत अाहे.  


२३ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाला पहिल्या सेटवरील विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करताना तिने ट्रायबेकरपर्यंत रंगलेला हा सेट ७-५ ने जिंकला. यासह तिने लढतीमध्ये अाघाडी मिळवली. त्यानंतर तिने अापली अाक्रमक खेळी कायम ठेवली. त्यामुळे सेरेनाला दुसरा सेट सहज जिंकता अाला. यादरम्यान तिने ३४ विनर्स मारले. यामुळे तिला विजयाचे खाते उघडले.   


दुसरीकडे मकाराेवाने एकेरीच्या लढतीमध्ये सरळ दाेन सेटवर विजय संपादन केला. तिने फ्लिपकेन्सवर मात केली. तिने ६-२, ६-४ ने सामना जिंकला.   


अझारेंकाचा एकतर्फी विजय

व्हिक्टाेरिया अझारेंकानेही महिला एकेरीमध्ये विजयी सलामी दिली. तिने पहिल्या फेरीमध्ये वाॅटसनचा पराभव केला.तिने ६-४, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला पुढची फेरी गाठता अाली.

बातम्या आणखी आहेत...