आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा: सलामीला शारापोवाचे पॅकअप; युकी विजयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारिया - Divya Marathi
मारिया

इंडियन वेल्स (अमेरिका)- माजी नंबर वन मारिया शारापाेवाला सलामीलाच इंडियन वेल्स अाेपन टेनिस स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. तिचा महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत अनपेक्षितपणे पराभव झाला. जपानच्या  नाअाेमी अाेसकाने सनसनाटी विजयाने महिला एकेरीत सलामी दिली. तिने ६-४, ६-४ ने सलामीला एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह तिने दुसऱ्या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. अाता तिचा सामना जागतिक क्रमवारीत ३१ व्या स्थानावर असलेल्या रादांवास्काशी हाेईल. भारताच्या युकी भांबरीने पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. त्याने रामनाथनचा ६-४, ६-२ ने पराभव केला.  


१६ वर्षीय अमांडाची सलामीे

अमेरिकेच्या १६ वर्षीय अमांडा अनिसिमाेवाने सलामीला शानदार विजय संपादन केला. तिने जागतिक क्रमवारीत ९४ व्या स्थानावर असलेल्या पाॅलीने पार्मेटियरचा पराभव केला. तिने ६-२, ६-२ ने सलामीचा सामना जिंकला. यामुळे तिला अाव्हान कायम ठेवताना अागेकूच करता अाली. अाता तिच्यासमाेर रशियाच्या एनास्तासिया पाव्लुचेंकाेवाचे तगडे अाव्हान असेल. यात बाजी मारून स्पर्धेच्या पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चितचा अमांडाचा मानस अाहे.   

 

बेलिंडाची १४३ मिनिटे झुंज 
स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनकिकला सलामीच्या विजयासाठी तब्बल १४३ मिनिटे  शर्थीची झुंज द्यावी लागली. तिने दाेन तास २३ मिनिटे रंगलेल्या मॅरेथाॅन लढतीत हंगेरीच्या तिमिया बाबाेसला पराभूत केले. तिने १-६, ६-१, ७-६ ने विजय संपादन केला.

 

समंथाची लाॅरेनवर मात 
अाॅस्ट्रेलियाच्या समंथा स्टाेसूरने स्पर्धेत विजयी सलामी दिली. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत अमेरिकेच्या लाॅरेन डेव्हिसचा पराभव केला. तिने ३-६, ६-३, ६-३ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासह तिला दुसरी फेरी गाठता अाली. 

बातम्या आणखी आहेत...