आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Manu Bheker, 16 year old World Champion Shooter Who Is Learning In Class XI!

अकराव्या वर्गात शिकणारी 16 वर्षीय मनू भाकर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुअाडालाजरा- भारताची १६ वर्षीय युवा नेमबाज मनू भाकर वर्ल्ड चॅम्पियनची मानकरी ठरली. तिने सोमवारी अायएसएसएफच्या नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये हे साेनेरी यश संपादन केले. अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मनूने फायनलमध्ये दाेन वेळच्या विश्वचषक विजेत्या अलेक्झेंड्राला पिछाडीवर टाकून सुवर्णपदकाचा वेध घेतला. तिने २३७.५ गुणांची कमाई करून सुवर्णपदक अापल्या नावे केले. याच स्पर्धेत भारताच्या रवी कुमारने पुरुष गटात कांस्यपदक पटकावले. अाता भारताच्या नावे दाेन सुवर्णपदकाची नाेंद झाली. 


यापूर्वी, पहिल्याच दिवशी शहजार रिझवीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताने अाता या स्पर्धेत एकूण पाच पदके जिंकली. यात दाेन सुवर्णसह तीन कांस्यपदकांचा समावेश अाहे.   
भारताच्या मनुने पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी करताना अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. या ठिकाणी तिने यजमान मेक्सिकाेच्या अलेक्झेंड्राचे अाव्हान माेडीत काढले. तिने फायनलमध्ये २३७.५ गुणांची कमाई केली. यामध्ये तिने दाेन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अलेक्झेंड्राला मागे टाकून ही कामगिरी साधली. मेक्सिकाेच्या नेमबाजाला २३७.१ गुणांसह राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. याच गटात फ्रान्सची सेलिन गाॅबरव्हिले २१७.० गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. या गटामध्ये भारताची यशस्विनी देसवालने चाैथे स्थान पटकावले. तिने १९६१. गुण संपादन केले. मात्र, तिला तिसऱ्या स्थानापर्यंत धडक मारता अाली नाही.   

 

रवी कुमार कांस्यचा ठरला मानकरी 
भारताच्या युवांनी पदक जिंकण्याची अापली माेहीम दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली. यात रवी कुमार यशस्वी ठरला. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले.  या गटात जगातील नंबर वन इस्तवान पेनी हा सुवर्णपदकाचा  मानकरी ठरला. तसेच अाॅस्ट्रियाच्या शेमरिलने राैप्यपदक जिंकले.

 

 ठरली भारताची पहिली युवा 

अायएसएसएफच्या विश्वचषकात सुवर्णपदक जिंकून मनू भाकरने भारताच्या नेमबाजीमध्ये इतिहास रचला. तिची ही एेतिहासिक कामगिरी ठरली. विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी  मनू ही भारताची सर्वात युवा नेमबाज ठरली. तिने वयाच्या १६ वर्षात हे एेतिहासिक साेनेरी यश संपादन केले अाहे.   

 

 

मनूची इतर खेळात  चमकदार कामगिरी 
भारताच्या मनू भाकरने मैदानावर प्रावीण्य मिळवण्याचा छंद यशस्वीपणे जपला अाहे. यातूनच तिने नेमबाजीशिवाय सहा खेळामध्ये साेनेरी यशाची चमकदार कामगिरी केली.  यात कराटेसह थांग ताचा समावेश अाहे. टेनिस, स्केटिंग, जलतरणमध्येही मनू तरबेज अाहे. यातही तिने चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळवला अाहे.  तिने नेमबाजीमध्ये  ९ महिन्यांच्या कसून सरावाच्या बळावर  ही कामगिरी केली अाहे.

 

मनूला अाता यूथ अाॅलिम्पिकचे मिळाले तिकीट 
विश्वचषकात मनू भाकरने  कामगिरीचा डबल धमाका उडवला. तिने महिलांच्या गटात सुवर्णपदक पटकावले. यासह ती अागामी युथ अाॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही संपादन केले अाहे. युवांची अाॅलिम्पिक स्पर्धा अाॅक्टाेबर महिन्यात ब्युनस अायर्स येथे रंगणार अाहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली युवा नेमबाज ठरली.

बातम्या आणखी आहेत...