आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांपूर्वी खेळण्याची संधी मिळत नव्‍हती; अाता राष्ट्रीय टीमचा कर्णधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षी सप्टेंबरमध्ये पहिला अांतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या मार्करामकडे अाता दक्षिण अाफ्रिकन टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. सुरुवातीला त्याचा हा प्रवास शानदार असल्यासारखा वाटताे. मात्र, पाच महिन्यांत त्याच्या जीवनात अनेक माेठ्या घटना घडल्या अाणि यातून त्याने ही नेतृत्वाची जबाबदारी मिळवली. कारण यादरम्यान ताे देश साेडणार असल्याच्या चर्चेला ऊत अाला हाेता. सप्टेंबर २०१७ मध्ये राष्ट्रीय टीमकडून खेळण्यास संधी मिळत नाही म्हणून तू विदेशी टीमकडून खेळण्याचा विचार करत अाहेस का, असा प्रश्न एका पत्रकाराने त्याला विचारला हाेता. मात्र, त्याने या सर्व तर्क-वितर्कांना फेटाळून लावले. ‘अापण असा काेणत्याही प्रकारचा विचार करत नाही. मला अापल्या देशाविषयी प्रेम अाहे. त्यामुळे मी इतर देशांकडून खेळण्याचा विचारच करू शकत नाही. मात्र, राष्ट्रीय टीमकडून संधी मिळत नाही, ताेपर्यंत इंग्लिश काउंटी क्रिकेटसाठी विदेशात जाण्याचा माझा मानस हाेता,’ असेही त्याने  सांगितले.   


सेंच्युरियनमध्ये जन्मलेल्या मार्करामला दाेन वर्षांचा असताना वडिलांनी त्याला क्रिकेटच्या किटचे गिफ्ट दिले हाेते. त्यामुळेच त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा खेळाकडे अधिक लागले. ताे सुरुवातीला फुटबाॅल अाणि क्रिकेट खेळत हाेता. २०१० मध्ये त्याची प्रिटाेरिया मुलांच्या शाळेतील टीममध्ये निवड झाली हाेती. येथूनच त्याच्या अायुष्याला कलाटणी मिळाली. कारण त्याला क्रिकेट या खेळामध्येच अधिक अावड निर्माण झाली. येथून त्याने या खेळातील अापला कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. २०१२ मध्ये त्याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळेच  २०१३ मध्ये त्याने टक्स क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळवला. येथील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची अाफ्रिकेच्या १९ वर्षांखालील युवा संघात निवड झाली. यातून त्याला वर्ल्डकपमध्ये खेळण्याचीही संधी मिळाली. त्याने या वर्ल्डकपमध्ये अापल्या देशाच्या युवा टीमचे यशस्वीपणे नेतृत्व केले अाणि अापल्या टीमला विश्वचषक मिळवून दिला.  त्यामुळे त्याची या वर्ल्डकपमध्ये मॅन अाॅफ द सिरीज पुरस्कारासाठी निवड झाली हाेती.   


मात्र, त्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.  त्यामुळे त्याला माेठी करसत करावी लागली. राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी त्याने अनेक प्रयत्नही केले.  मात्र, यात त्याला कुठल्याही प्रकारचे यश गवसत नव्हते. त्यामुळेच त्याने विदेशात खेळण्याचा विचार केला हाेता. 

 

रेकॉर्ड‌्स/पुरस्कार

 

- काेणत्याही लेव्हलवर क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारा अाफ्रिकेचा एकमेव कर्णधार अाहे.  
- २०१४ मध्ये त्याच्या नेतृृत्वात  युवांनी १९ वर्षांखालील विश्वचषक पटकावला हाेता.   
- मॅन अाॅफ सिरीज -१९ वर्षांखालील वर्ल्डकप -२०१४  
- वनडे क्रिकेटमध्ये दुसरा सर्वात युवा कर्णधार  
- पहिल्या कसाेटीत सर्वात माेठ्या स्काेअरवर (९७)  धावबाद 

बातम्या आणखी आहेत...