Home | Sports | Other Sports | news about FIFA world cup 2018

फिफा वर्ल्डकप: बापे रे बापे...फ्रान्सने अर्जेंटिनाला प्रथमच हरवले, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

दिव्‍य मराठी | Update - Jul 01, 2018, 08:45 AM IST

फ्रान्सकडून ४-३ने पराभूत होत अर्जेंटिनाने वर्ल्डकपचे मैदान सोडले. फ्रेंच एमबापेच्या २ गोल व एका पेनल्टी गोलमुळे मेसीचे स

 • news about FIFA world cup 2018
  पेलेनंतर अाता युवा फुटबाॅपटू ठरला एम्बापे

  कझान- फ्रान्सकडून ४-३ने पराभूत होत अर्जेंटिनाने वर्ल्डकपचे मैदान सोडले. फ्रेंच एमबापेच्या २ गोल व एका पेनल्टी गोलमुळे मेसीचे स्वप्न भंगले. ग्रीझमन व पॅवार्डने प्रत्येकी १ गोल केला. अर्जेंटिनाचा कर्णधार मेसी एकही गोल करू शकला नाही.

  १९ वर्षीय युवा फुटबाॅलपटू एम्बापेच्या (६४, ६८ वा मि.) लक्षवेधी कामगिरीच्या बळावर १९९८ च्या वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स संघाने शनिवारी २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. फ्रान्सने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाचा पराभव केला. एम्बापेसह अॅटाेनी ग्रिजमॅन (१३ वा मि.), बेजामिन पावार्ड (५७ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून फ्रान्सचा विजय निश्चित केला. अर्जेंटिनासाठी डी. मारिया (४१ वा मि.), मेकार्डाे (४८ वा मि.) अाणि सर्जियाे अायुर्गाे (९०+३ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. राेमहर्षक विजयासह फ्रान्सचा संघ अंतिम अाठमध्ये दाखल झाला. या विजयाच्या बळावर जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने पुन्हा एकदा विश्वविजेता हाेण्याचे संकेत दिले. अाता अापली हीच विजयी माेहीम कायम ठेवण्याचा या संघाचा प्रयत्न असेल. फ्रान्सचा स्पर्धेतीला हा तिसरा विजय ठरला.


  स्पेन-रशिया अाज लढत : स्पेन संघ अापली विजयी माेहीम अबाधित ठेवण्याच्या इराद्याने उतरणार अाहे. यजमान रशियाचा अंतिम १६ मधील सामना रविवारी स्पेनशी हाेणार अाहे. तसेच क्राेएशिया अाणि डेन्मार्क यांच्यात रात्री झुंज रंगणार अाहे.

  मेसीच्या अपयशाने पॅकअप
  लाजिरवाण्या पराभवामुळे मेसीच्या अर्जेंटिना संघावर नाॅकअाऊटमधूनच पॅकअप करण्याची नामुष्की अाेढावली. मेसीच्या अपयशामुळे अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला. गत सामन्यात एक गाेल करून अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित करून देणारा मेसी फ्रान्सविरुद्ध सामन्यात सपशेेल अपयशी ठरला. त्यामुळेच संघाला बाहेर पडावे लागले.

  डावपेचाने अर्जेंटिनाच्या विजयाचे चुकले गणित
  प्रशिक्षक काेच साम्पाेली यांच्या डावपेचाने अर्जेंटिनाचा घात केला. त्यांच्या याच डावपेचाने विजयाने गणित पूर्णपणे चुकले. त्यामुळे अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी सामन्यातील अापली रणनीतीच बदलून टाकली. त्यामुळे टीमला बाहेर पडावे लागले.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, मेसी निवृत्तीकडे?

 • news about FIFA world cup 2018

  मेसी निवृत्तीकडे?

  - सर्वाधिक चर्चा मेसीच्या निवृत्तीची आहे. २०१६ मध्ये निवृत्ती घेऊनही परतला.

  - ३१ वर्षांचा मेसी पुढील वर्ल्डकपपर्यंत पस्तिशीचा होईल. यंदा वर्ल्डकपमध्ये पस्तिशीपारचे १० खेळाडू आहेत.

  - पोर्तुगालचे कोच म्हणाले, ३३ वर्षांचा रोनाल्डो पुढील वर्ल्डकप खेळू शकतो. यामुळे मेसीला वयाचा निकष लावणे कठीणच आहे.

  - जर्मनी गतविजेता, अर्जेंटिना उपविजेता होता. २०१४मध्ये अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर

   

   

 • news about FIFA world cup 2018

  पेलेनंतर अाता युवा फुटबाॅपटू ठरला एम्बापे
  फ्रान्सच्या १९ वर्षीय एम्बापेची नाॅकअाऊट सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने या सामन्यात चार मिनिटांच्या फरकाने सलग दाेन गाेल केले. यासह त्याने फ्रान्सचा राेमहर्षक विजय निश्चित केला. तसेच पेलेनंतर एम्बापे हा दुसरा युवा ठरला. ज्याने विश्वचषकातील एकाच सामन्यात दाेन गाेल केले. यापूर्वी पेलेने १९५८ मध्ये असाच पराक्रम स्वीडनविरुद्ध लढतीत गाजवला हाेता. 

Trending