Home | Sports | Other Sports | news about test match between south africa and australia

SA vs AUS TEST: मार्करामचे शानदार शतक; अाफ्रिकेची दमदार सुरुवात

वृत्तसंस्था | Update - Mar 31, 2018, 12:41 AM IST

मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या यजमान दक्षिण अाफ्रिका संघाने शुक्रवारी अाॅस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या अाणि न

 • news about test match between south africa and australia

  जाेहान्सबर्ग - मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या यजमान दक्षिण अाफ्रिका संघाने शुक्रवारी अाॅस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या अाणि निर्णायक कसाेटीत दमदार सुरुवात केली. मार्करामच्या (१५२) शतकाच्या बळावर यजमानांनी पहिल्या डावात दिवसअखेर ६ बाद ३१३ धावा काढल्या. यात डिव्हिलीयर्सच्या (६९) अर्धशतकाचे माेलाचे याेगदान ठरले.

  अाता बवुमा (२५) व डिकाॅक (७) मैदानावर खेळत अाहेत. दरम्यान, बाॅल टेम्परिंगच्या प्रकरणाने नामुष्की अाेढवलेल्या अाॅस्ट्रेलियन टीमच्या गाेलंदाजांना पहिल्या दिवशी समाधानकारक खेळी करता अाली नाही. याचाच फायदा घेत यजमानांच्या सलामीवीर मार्करामने टीमच्या धावसंख्येला गती दिली.


  गत विजयाने यजमान दक्षिण अाफ्रिकेने चार कसाेटींच्या मालिकेत २-१ ने अाघाडी घेतली अाहे. अाता निर्णायक चाैथ्या कसाेटीत बाजी मारून घरच्या मैदानावरील ही मालिका अापल्या नावे करण्याचा यजमानाचा मानस अाहे. यासाठी कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वात अाफ्रिकेचा संघ उल्लेखनीय खेळी करत अाहे. दरम्यान, सलामीवीर डीन एल्गरने १९ अाणि हाशिम अामलाने २७ धावांचे याेगदान दिले.


  नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण अाफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डीन एल्गर व मार्करामने कर्णधार डुप्लेसिसचा हा याेग्य ठरवला. त्यांनी दमदार सुरुवात करताना अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यांनी ५३ धावांची भागीदारी रचली.

  मार्करामच्या १५२ धावा
  यजमान दक्षिण अाफ्रिकेच्या सलामीवीर मार्करामने शानदार खेळी करताना करिअरमधील चाैथे कसाेटी शतक साजरे केले. त्याने २१६ चेंडूंचा सामना करताना १७ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे १५२ धावा काढल्या. त्याने सलामीवीर डीन एल्गरसह हाशिम अामला अाणि डिव्हिलीयर्ससाेबत अर्धशतकी भागीदारी रचली.

  मार्कराम-अामलाची भागीदारी
  फाॅर्मात असलेल्या मार्करामला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अालेल्या हाशिम अामलाची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. त्यांनी अाॅस्ट्रेलियाच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान, माेठ्या खेळीच्या प्रयत्नात असलेला अामला २७ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

Trending