Home | Sports | Other Sports | Rahane gets 12 lakh fine, violation of the Code of Conduct

संथ गाेलंदाजीने अजिंक्य रहाणेला 12 लाखांचा दंड, अाचारसंहितेचे केले उल्लंघन

वृत्तसंस्था | Update - May 15, 2018, 12:58 AM IST

युवा कर्णधार अजिंक्य रहाणेने अापल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाच्या यंदाच्या अायपीएलमधील प्ले अाॅफ प्

  • Rahane gets 12 lakh fine, violation of the Code of Conduct
    मुंबई - युवा कर्णधार अजिंक्य रहाणेने अापल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाच्या यंदाच्या अायपीएलमधील प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा कायम ठेवल्या.
    या टीमने गत सामन्यात गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर धडाकेबाज विजय संपादन केला. राजस्थानची यातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. मात्र, दरम्यानच्या संथ गाेलंदाजीमुळे राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला कारवाईला सामाेरे जावे लागले. त्याच्यावर समितीने दंडात्मक कारवाई केेली. त्यामुळे त्याला या प्रकरणी १२ लाख रुपयांचा दंड ठाेठावण्यात अाला. अायपीएलच्या अाचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात अाल्याची माहिती समितीने दिली. राजस्थान संघाने ७ गड्यांनी हा सामना जिंकला. गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमविरुद्धच्या या विजयाने अाता राजस्थान संघाचा अात्मविश्वास द्विगुणीत झाला अाहे. अाता हीच लय कायम ठेवण्याचा रहाणेचा मानस अाहे.

Trending