आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळी डावातून राहुलने जिंकले सुवर्णपदक, सुशील ठरला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेल्डकाेस्ट- बीडचा प्रतिभावंत कुस्तीपटू राहुल अावारेने मुळी डावाच्या बळावर गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेत डबल चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठाेपाठ  दाेन वेळच्या अाॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमारने दमदार पुनरागमन करताना सुवर्णपदकाची कमाई केली. महिला कुस्तीपटू बबिताने कांस्यपदक जिंकले. त्यापाठाेपाठ महाराष्ट्राच्या अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंतने राैप्यपदक जिंकले. याशिवाय सीमा पुनिया अाणि नवज्याेत िढल्लाेने भारतीय संघाला अनुक्रमे राैप्य व कांस्यपदक पटकावले. भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत अाठव्या दिवशी एकूण सात पदके जिंकली. यामध्ये दाेन सुवर्णासह दाेन राैप्य व तीन कांस्यपदकांचा समावेश अाहे. भारताच्या नावे एकूण ३१ पदके झाली. यामध्ये १४ सुवर्ण, सात राैप्य व दहा कांस्यपदके अाहेत.   

राहुल डबल चॅम्पियन 
पुण्याचे काका पवार यांचा पठ्ठा राहुल अावारे हा राष्ट्रकुल स्पर्धेत डबल चॅम्पियन ठरला. त्याने २००८ च्या यूथ राष्ट्रकुलनंतर अाता २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याने गुरुवारी ५७ किलाे वजन गटाच्या फायनलमध्ये कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीला धूळ चारली. त्याने मुळी डावाच्या सुरेख खेळीतून हा विजयश्री खेचून अाणला. दबदबा कायम ठेवताना त्याने १५-७ ने सामना जिंकला. पहिल्या फेरीत ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर त्याने दमदार कमबॅक केले. ४-४ ने बराेबरी साधली. सरस खेळी करताना त्याने ६-४ ने अाघाडी घेतली. त्याने ९-६ अाणि १३-६ व १५-७ ने गुणाची कमाई करताना सामना नावे केला. 


काेच काका पवार गहिवरले.. 

 अथक मेहनतीचे, परिश्रमांचे, जिद्दीचे फळ त्याच्या सुवर्णपदकाच्या रूपाने साकार झाले आहे. .राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेणाऱ्या राहुलविषयी बोलताना त्याचे काेच काका पवार यांना आनंदाश्रू आवरत नव्हते.. केंद्रात आनंदाचा जल्लोष सुरू होता. 

 

सुशीलला ८० सेकंदांत तिसरे सुवर्णपदक 
अाॅलिम्पियन सुशीलकुमारने भारतीय संघाला तिसरे राष्ट्रकुल सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने गुरुवारी अवघ्या ८०  सेकंदांमध्ये ७४ किलाे वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या गटाच्या फायनलमध्ये दक्षिण अाफ्रिकेच्या बाेथा जाेहानेसला पराभूत केले. त्याने १०-० अशा फरकाने एकहाती बाजी मारली. यासह ताे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी त्याने २०१० (दिल्ली), २०१४ (ग्लासगाे) अाणि अाता २०१८ (गाेल्ड काेस्ट) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पदक तालिका (टॉप-१०)...  

बातम्या आणखी आहेत...