Home | Sports | Other Sports | Russia Badminton Tournaments, Saurabh become champion

साैरभ चॅम्पियन; किताब जिंकणारा भारताचा पहिला पुरुष खेळाडू ठरला

वृत्तसंस्था | Update - Jul 30, 2018, 07:46 AM IST

भारताचा प्रतिभावंत खेळाडू साैरभ वर्मा हा रशिया अाेपन सुपर टूर बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरला.

 • Russia Badminton Tournaments, Saurabh become champion

  ब्लादिवाेस्टाॅक- भारताचा प्रतिभावंत खेळाडू साैरभ वर्मा हा रशिया अाेपन सुपर टूर बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने अापल्या करिअरमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला. दुसरीकडे भारताच्या राेहन कपूर अाणि कुहू गर्गने मिश्र दुहेरीत उपविजेतेपद अापल्या नावे केले. त्यांना या गटाच्या फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताची ही दुसरी मानांकित जाेडी उपविजेतेपदाची मानकरी ठरली.


  माजी नॅशनल चॅम्पियन साैरभ वर्माने रविवारी एकेरीच्या फायनलमध्ये जपानच्या काेकी वतानाबेचा पराभव केला. त्याने १८-२१, २१-१२, २१-१७ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याने ६० मिनिटे शर्थीची झुंज दिली. यातून अाठव्या मानाांकित साैरभला या किताबावर नाव काेरता अाले. यातील झुंज अपयशी ठरल्याने जपानच्या बिगरमानांकित वतानाबेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये बाजी मारत अाघाडी मिळवली हाेती. मात्र, साैरभने वेळीच दमदार पुनरागमन करताना दुसरा अाणि तिसरा निर्णायक गेम जिंकून सामना अापल्या नावे केले.


  विजयासाठी ६० मिनिटे दिली शर्थीची झुंज
  माजी नॅशनल चॅम्पियन साैरभला करिअरमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचा किताब अापल्या नावे करण्यासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. यासाठी घेतलेल्या मेहनतीतून त्याला हा साेनेरी यशाचा पल्ला गाठला. पहिल्या गेममध्ये त्याचा प्रयत्न कमी पडला. यातूनच जपानच्या खेळाडूने बाजी मारून अाघाडी घेतली. मात्र, त्यानंतर साैरभने वेळीच सामन्यावर मजबूत पकड घेतली. त्यामुळे त्याला दुसरा गेम जिंकून लढतीत बराेबरी साधता अाली. त्यानंतर त्याने ही लय कायम ठेवत निर्णायक गेम जिंकला अाणि सामना अापल्या नावे केला.


  पहिला भारतीय पुरुष
  या स्पर्धेतील पुरुष एकेरीचा किताब जिंकणारा साैरभ हा भारताचा पहिला खेळाडू ठरला. भारताच्या खेळाडूला प्रथमच किताबाचा हा पल्ला गाठता अाला. यातूनच त्याने हा विक्रम नाेंदवला. तसेच या स्पर्धेत चॅम्पियन हाेणारा साैरभ हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी २०१६ मध्ये शिवानीने या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले हाेते.


  राेहनचा प्रयत्न अपुरा
  भारताच्या राेहनने सरस खेळी करताना कुहू गर्गसाेबत मिश्र दुहेरीची अंितम फेरी गाठली हाेती. या दुसऱ्या मानांकित जाेडीला अंतिम सामन्यात काेरियाच्या मिन क्युंग किम अाणि इवानाेवने पराभूत केले. त्यांनी २१-१९, २१-१७ अशा फरकाने सामना जिंकला. यातून ही जाेडी चॅम्पियन ठरली.

Trending