आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Samit Dravid Scored 150 Runs And Aryan Joshi Slammed 154 Runs In This Match.

द्रविडसाठी स्पेशल ठरला यंदाचा बर्थडे, मुलाने एक दिवस आधी दिले सरप्राईज गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समित सुद्धा आपल्य पित्याप्रमाणे जबरदस्त क्रिकेटर आहे. - Divya Marathi
समित सुद्धा आपल्य पित्याप्रमाणे जबरदस्त क्रिकेटर आहे.

स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट टीमचा माजी दिग्‍गज क्रिकेटर राहुल द्रविड आज (11 जानेवारी) आपला 45 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. त्याच्या आजच्या बर्थडेच्या एक दिवस आधी त्याचा मोठा मुलगा समितने त्याला एक खास गिफ्ट दिले. समित सुद्धा आपल्य पित्याप्रमाणे जबरदस्त क्रिकेटर आहे. नुकतेच त्याने अंडर-14 च्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करताना शतक ठोकले. खेळली 150 धावांची इनिंग...

 

- कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या BTR कपमध्ये समितने माल्या अदिती इंटरनॅशनल स्कूलकडून विवेकानंद स्कूलविरोधात शतक ठोकत टीमला 412 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
- मॅचमध्ये समितने शानदार 150 धावा केल्या. मात्र, या मॅचमध्ये त्याचा बेस्ट स्कोर नव्हता. कारण याच सामन्यात माजी भारतीय स्पिनर सुनील जोशीचा मुलगा आर्यन जोशीने 154 धावांची खेळी केली. 
- समित आणि आर्यनने मिळून टीमचा स्कोर 500/5 पर्यंत नेला. या दोघांच्या खेळीनंतर माल्या अदितीच्या बॉलर्सनी कहर करत विवेकानंद स्कूलच्या टीमला 88 धावांत बाद केले. 

 

अशी आहे राहुल द्रविडची फॅमिली-

 

- राहुल द्रविडने 4 मे 2003 मध्ये नागपूरची राहणारी विजेता पेंढारकरसोबत लग्न केले, जी पेशाने सर्जन डॉक्टर आहे.
- या कपलला दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव समित आहे ज्याचा जन्म 2005 मध्ये झाला तर, छोट्या मुलाचे नाव अन्वय आहे ज्याचा जन्म वर्ष 2009 मध्ये झाला.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, राहुल द्रविडसोबत त्याच्या मुलाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...