Home | Sports | Other Sports | satish shivalingam, India Lift The Gold Medal In 2018 Commonwealth Games

भारताला तिसरे सुवर्णपदक! सतीश शिवलिंगमची वेटलिफ्टिंगमध्ये 77 किलो वजनी गटात कामगिरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 07, 2018, 09:05 AM IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने तिसरे सुवर्णपदक मिळवले आहे. सतिश शिवलिंगम याने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलून

 • satish shivalingam, India Lift The Gold Medal In 2018 Commonwealth Games
  सतिश शिवलिंगम याने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

  गोल्ड कोस्ट​- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने तिसरे सुवर्णपदक मिळवले आहे. सतीश शिवलिंगम याने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यासोबतच भारताने या स्पर्धेत आतापर्यंत पाच पदकांची कमाई केली आहे. यात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा सामावेश आहे. हे पाचही पदकं वेटलिफ्टिंग या क्रिडा प्रकारात मिळाले आहेत.

  आतापर्यंत यांनी पटकावले पदकं....

  संजिता चानू- सुवर्ण
  > संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं. संजिता चानू ही मूळ मणिपूरची आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह तीन पदकांची कमाई केली. संजिता चानूने 192 किलो किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिलं, जो एक विश्वविक्रम आहे.

  मीराबाई चानू- सुवर्ण

  > मणिपूरची वेटलिफ्टर मीराबाई चानूने गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. २३ वर्षांच्या चानूने स्नॅचमध्ये ८६ व क्लीन अँड जर्कमध्ये ११० किलो वजन उचलले. तिने एकूण १९६ किलो वजन उचलले. ते रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेतीने उचललेल्या वजनापेक्षा ४ किलोंनी जास्तच आहे. चानूने याआधी २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.

  गुरुराजा - रौप्य

  > राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या खाताच्या खात्यात रौप्य पदक पडले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात गुरुराजा यांनी 249 किलो वजन उचलून भारताला पहिल्या पदकाची कमाई करून दिली.

  दीपक लाथर- कांस्य

  > ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. दीपकने पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. दीपकने स्नॅचमध्ये 136 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 159 किलो असं मिळून 295 किलो वजन उचललं. ही कामगिरी त्याला कांस्यपदक मिळवून देणारी ठरली.हरियाणाच्या दीपक लाथरने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद मानण्यात येत आहे. तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं पदक ठरलं.

  पुढील स्लाइडवर पाहा यांनी केली ही कामगीरी...फोटोज्...

 • satish shivalingam, India Lift The Gold Medal In 2018 Commonwealth Games

  मणिपूरची वेटलिफ्टर मीराबाई चानूने गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. २३ वर्षांच्या चानूने स्नॅचमध्ये ८६ व क्लीन अँड जर्कमध्ये ११० किलो वजन उचलले.

 • satish shivalingam, India Lift The Gold Medal In 2018 Commonwealth Games

  संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं. 

 • satish shivalingam, India Lift The Gold Medal In 2018 Commonwealth Games

  राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या खाताच्या खात्यात रौप्य पदक पडले​. वेटलिफ्टिंगमध्ये 56 किलो वजनी गटात गुरुराजा यांनी 249 किलो वजन उचलून भारताला पहिल्या पदकाची कमाई करून दिली.

 • satish shivalingam, India Lift The Gold Medal In 2018 Commonwealth Games

  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. दीपकने पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली.

Trending