आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया अाज एेतिहासिक मालिका विजयासाठी मैदानावर! भारताची मालिकेत १-० ने अाघाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ- सलामीच्या विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ शुक्रवारी इंग्लंडमध्ये एेतिहासिक मालिका विजयासाठी सज्ज झाला अाहे. टीम इंडियाला ही संधी अाहे. भारत अाणि इंग्लंड यांच्यात अाज मालिकेतील दुसरा टी-२० सामना रंगणार अाहे. भारताने विजयी सलामी देताना तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता दुसऱ्या विजयाने टीम इंडियाला ही मालिका अापल्या नावे करता येईल. 


कुलदीप, लाेकेश सज्ज
सलामीला माेठा विजय संपादन करून देणारा गाेलंदाज कुलदीप यादव अाणि युवा फलंदाज लाेकेश राहुल अाता बाजी मारण्यासाठी सज्ज अाहेत. कुलदीपने गत सामन्यात ५ विकेट घेतल्या. तसेच लाेकेशने (१०१) नाबाद शतक ठाेकले. 


इंग्लंडची प्रतिष्ठा पणाला
सलामीच्या पराभवाने यजमान इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला अाहे. पिछाडीवर असलेल्या यजमानांसाठी अाता दुसरा सामना हा निर्णायक असेल. यातील पराभवाने इंग्लंडवर घरच्या मैदानावर मालिका पराभवाची नामुष्की अाेढावू शकते. अातापर्यंत भारताने या ठिकाणी अद्याप मालिका विजय संपादन केला नाही. 

बातम्या आणखी आहेत...