आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमाेना, फेडरर विजयी; सहा वेळचा चॅम्पियन याेकाे बाहेर; अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- नंबर वन सिमाेना हालेप, स्वीसकिंग राॅजर फेडरर, जर्मनीची एंजेलिक कर्बरने साेमवारी अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दुसरीकडे सहा वेळच्या अाॅस्ट्रेलियन अाेपन चॅम्पियन नाेवाक याेकाेविकला पॅकअप करावे लागले. या पराभवाने त्याचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्याला काेरियाच्या हायाेन चंुगने पराभूत केले. त्यापाठाेपाठ भारताच्या राेहन बाेपन्ना अाणि दिविज शरणलाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यांचा अापापल्या गटात पराभव झाला.   


एंजेलिक कर्बरने महिला एकेरीत चीन-तैपेईच्या सू वेईवर मात केली. तिने ४-६, ७-५, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. बिगरमानांकित सांदाग्रेनने पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये शानदार विजय संपादन केला. त्याने लढतीत पाचव्या मानांकित डेव्हिड थिएमला पराभूत केले. त्याने ६-२, ४-६, ७-६, ६-७, ६-३  ने विजयाची नाेंद केली.   

 
बर्डिचची फाेगनिनीवर मात : पुरुष एकेरीत १९ व्या मानांकित टाॅमस बर्डिचने अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. त्याने लढतीत २५ व्या मानांकित फेबियानाे फाेगनिनीचा पराभव केला. त्याने ६-१, ६-४, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला पुढची फेरी गाठता अाली. 

 

सिमाेनाकडून अाेसाकाचा पराभव 
अव्वल मानांकित सिमाेना हालेपने महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने लढतीत नाअाेमी अाेसाकाचा पराभव केला. तिने ६-३, ६-२ अशा फरकाने सरळ दाेन सेटवर एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह तिला अापली विजयी माेहीम कायम ठेवता अाली.   

 

 

बाेपन्ना, दिविजचे अाव्हान संपुष्टात 
भारताच्या राेहन बाेपन्नाला सहकारी राॅजर वेस्लिनसाेबत पराभवाचा सामना करावा लागला. या जाेडीला अाेलिव्हर मराच-माते पेविचने ६-४, ६-७, ६-३ ने पराभूत केले. मार्सेलाे -लुकासने  शरण-राजीव रामला ४-६, ७-६, ६-४ ने हरवले. 

 

फेडररचा सहज विजय
गत चॅम्पियन राॅजर फेडररने सहज अंतिम १६ चा सामना जिंकला. त्याने हंगेरीच्या मार्टन फुकसाेविक्सला पराभूत केले. त्याने  ६-४, ७-६, ६-२ ने विजय मिळवला. अाता त्याचा अंतिम अाठमधील सामना    बर्डिचशी हाेईल.  

 

याेकाेविकला पाहून शिकला टेनिस; अाता त्याच्यावरच मात
काेरियाच्या हायाेन चुंगने साेमवारी सनसनाटी विजय संपादन केला. त्याने सहा वेळच्या चॅम्पियन नाेवाक याेकाेविकला ७-६, ७-५, ७-६ ने पराभूत केले. यासह त्याला अंतिम अाठमध्ये प्रवेश करता अाला. लहानपणी २१ वर्षीय चंुगने याेकाेविकची खेळी पाहून टेनिसचे धडे घेतले अाणि अाता त्याच्यावरच शानदार विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...