आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकविरुद्ध विजयासाठी भारतीय संघ सज्ज;अाज चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सलामीला काट्याची लढत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेड्रा- भारतीय हाॅकी संघ अाता आपल्या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सलग चाैथ्या विजय नाेंदवण्यासाठी सज्ज झाला अाहे. हाॅलंडमध्ये अाज रविवारपासून चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारत अाणि पाक समाेरासमाेर असतील. या सलामीला बाजी मारून पाक संघावरचे अापले वर्चस्व अबाधित ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यावर सर्वांची नजर असेल. गाेलरक्षक पी. अार. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. यातूनच हा सामना अधिक रंगतदार हाेईल. 


अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाने गत २०१६ मधील एशियन चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला हाेता. त्यानंतर भारताने गत वर्षी लंडन येथे झालेल्या हाॅकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्येही पाकला धूळ चारली. त्यापाठाेपाठ भारताने अाशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानवर मात केली अाणि १० वर्षांनंतर अाशिया चषक पटकावला. 


यजमानांसमाेर अर्जेंटिनाचे अाव्हान 
पहिल्याच दिवशी हाेणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यजमान हाॅलंडच्या संघाला घरच्या मैदानावर रिअाे अाॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. त्यामुळे यजमानांना विजयासाठी माेठी कसरत करावी लागेल. त्यानंतर अाॅस्ट्रेलिया अाणि बेल्जियम यांच्यात सामना रंगणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...