आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसमध्ये भीषण अपघातानंतर कार 20 फूट उंच उसळली;दाेन्ही कारचे ड्रायव्हर वाचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेंडलर (एरिजाेना) - अमेरिकेतील एनएचअारए एरिजाेना नॅशनल्स कार रेसचा क्वार्टर फायनल एलिमिनेशन राऊंडचा थरार रंगला हाेता.   ६८ वर्षीय जाॅन फाेर्सने रेसमध्ये २८ वर्षीय जाॅनी लिंडबर्गवर अाघाडीचा प्रयत्न सुरू केला.   फिनीश लाईनच्या जवळ जाॅनची कार अाली. फ्युल लीक हाेण्यास सुरुवात झाली. काही सेकंदात कारला अाग लागली. दरम्यान, त्याची कार ही वेगात असलेल्या जाॅनीच्या कारला धडकली. त्यामुळे भरधाव कारची धडक बसली अाणि जाॅनीची कार २० फूट उंच वरती उसळली. त्यानंतर दाेन्ही कार भितींवर धडकल्या. दरम्यान, त्यांचे पॅराशूटही अाेपन झाले हाेते. त्यामुळे हे दाेघे वाचले.

 

११ वर्षांपूर्वीही झाला हाेता जाॅनचा अपघात
१६ वेळच्या फन्ने कार चॅम्पियन जाॅनला यापूर्वीही असाच भीषण अपघात झाला हाेता. २००७ मध्ये एनएचअारए फाॅल नॅशनलच्या दुसऱ्या फेरीमध्ये विजयानंतर फिनिश लाइनच्या जवळ त्याच्या कारचे टायर फुटले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...