FIFA WORLD CUP / FIFA WORLD CUP : मेक्सिकोचा विजयाचा जल्लोष इतका की भूकंपाने हादरली जमीन

ही सिस्मोग्राफ रीडिंग सामन्याच्या रात्रीची आहे. लाल रेषांमध्ये स्थानिक वेळेतील (११ वाजून ३२ मिनिटे) रीडिंग दर्शवण्यात आली. याच वेळेमध्ये मॅक्सिकोने सामना जिंकला होता. रीडिंगच्या लाल रेषांमध्ये धरणी कंप दाखवला आहे. ही सिस्मोग्राफ रीडिंग सामन्याच्या रात्रीची आहे. लाल रेषांमध्ये स्थानिक वेळेतील (११ वाजून ३२ मिनिटे) रीडिंग दर्शवण्यात आली. याच वेळेमध्ये मॅक्सिकोने सामना जिंकला होता. रीडिंगच्या लाल रेषांमध्ये धरणी कंप दाखवला आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोच्या संघाने १-० ने नमवल्यानंतर मेक्सिकोच्या चाहत्यांनी इतका जल्लोष केला की, अक्षरश: धरणीकंप झाला. हा कृत्रिम भूकंपच होता. नुकसान होईल इतकी त्याची तीव्रता नव्हती. पण चाहत्यांचा हा जल्लोष आगळा ठरला. मेक्सिकोतील भूगर्भीय आणि वातावरण संस्थेनुसार, “सामन्याच्या ३५ व्या मिनिटांत हिलविज लोजानोने मेक्सिकोसाठी गोल केला. त्यानंतर ७ सेकंदात सिस्मोग्राफमध्ये पहिले कंपन जाणवले. कंपनाची तीव्रता कमी होती.

दिव्य मराठी

Jun 19,2018 06:38:00 AM IST

मेक्सिको सिटी - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोच्या संघाने १-० ने नमवल्यानंतर मेक्सिकोच्या चाहत्यांनी इतका जल्लोष केला की, अक्षरश: धरणीकंप झाला. हा कृत्रिम भूकंपच होता. नुकसान होईल इतकी त्याची तीव्रता नव्हती. पण चाहत्यांचा हा जल्लोष आगळा ठरला. मेक्सिकोतील भूगर्भीय आणि वातावरण संस्थेनुसार, “सामन्याच्या ३५ व्या मिनिटांत हिलविज लोजानोने मेक्सिकोसाठी गोल केला. त्यानंतर ७ सेकंदात सिस्मोग्राफमध्ये पहिले कंपन जाणवले. कंपनाची तीव्रता कमी होती.

पण या कंपना मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी हा कृत्रिम भूकंप असल्याचे समोर आले. एका वेळी अनेक लोकांनी उड्या मारल्यामुळे (मास जंपिंग) हे कंपन जाणवल्याचे स्पष्ट झाले. मॅक्सिकोचा संघ जिंकणार असल्याचे स्पष्ट होताच पुन्हा एकदा कंपन झाले. संस्थेतील दोन्ही सेन्सरने ही हालचाल रेकॉर्ड केली.’


२०११ मध्ये रॉक कॉन्सर्टमुळे धरणी कंप : २०११ मध्ये न्यूझिलँडमध्ये रॉक कॉन्सर्टमुळे कृत्रिम भूकंप झाला. ऑकलँडमध्ये अमेरिकन पॉप बँड ‘फू फायटर्स’च्या इव्हेंटवेळी हा अनुभव आला. बँडचा प्रमुख गायक डेव्ह ग्रोल सादरीकरणाला व्यासपीठावर येताच गर्दीचा उत्साह इतका वाढला की ऑकलँडमधील भूकंप मापकात याची नोंद झाली.

मॅक्सिकोतील कृत्रिम भूकंपाचा हा पुरावा

ही सिस्मोग्राफ रीडिंग सामन्याच्या रात्रीची आहे. लाल रेषांमध्ये स्थानिक वेळेतील (११ वाजून ३२ मिनिटे) रीडिंग दर्शवण्यात आली. याच वेळेमध्ये मॅक्सिकोने सामना जिंकला होता. रीडिंगच्या लाल रेषांमध्ये धरणी कंप दाखवला आहे.

मागील वर्षीही अनुभव

फिफा विश्वचषकादरम्यान मागील वर्षीही असाच अनुभव आला. १९८२ नंतर पहिल्यांदा पेरूचा संघ न्यूझीलंडला हरवून फिफासाठी पात्र ठरला तेव्हा असाच जल्लोष करण्यात आला होता. या विजयामुळे झालेल्या जल्लोषानंतर तेथेही कृत्रिम भूकंप झाला.

X
ही सिस्मोग्राफ रीडिंग सामन्याच्या रात्रीची आहे. लाल रेषांमध्ये स्थानिक वेळेतील (११ वाजून ३२ मिनिटे) रीडिंग दर्शवण्यात आली. याच वेळेमध्ये मॅक्सिकोने सामना जिंकला होता. रीडिंगच्या लाल रेषांमध्ये धरणी कंप दाखवला आहे.ही सिस्मोग्राफ रीडिंग सामन्याच्या रात्रीची आहे. लाल रेषांमध्ये स्थानिक वेळेतील (११ वाजून ३२ मिनिटे) रीडिंग दर्शवण्यात आली. याच वेळेमध्ये मॅक्सिकोने सामना जिंकला होता. रीडिंगच्या लाल रेषांमध्ये धरणी कंप दाखवला आहे.
COMMENT