आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या खात्यात आणखी 5 पदके; शूटर जीतूला सुवर्ण, अपूर्वी-ओमला कांस्य, मेहूली-प्रदीपला रौप्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंगमध्ये जीतू रायने सुवर्ण, ओम मिथारवलने कांस्य पदक पटकवले. - Divya Marathi
शूटिंगमध्ये जीतू रायने सुवर्ण, ओम मिथारवलने कांस्य पदक पटकवले.

गोल्ड कोस्ट-

राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी भारताच्या खात्यात आणखी 5 पदके पडली आहेत. नेमबाजीत भारताला आठवे सुवर्ण जीतू रायने मिळवून दिले आहे. 10 मीटर पिस्टल शूटिंगमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. तर याच गटात ओम मिथरवाल कांस्य पदक पटकवले आहे. महिला खेळाडू देखील नेमबाजीत मागे नाहीयेत. 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये मेहूली घोषने रौप्य पदक मिळवले आहे, तर याच गटात अपूर्वी चंदेलाने कांस्य पदकाची कमाई केली आहे. 

 

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. वेटलिफ्टिर प्रदीप सिंहने 105 किलो वजनी गटात 352 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले आहे. यासोबतच भारताच्या खात्यात एकून 17 पदके पडली आहेत. यात 8 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. यासोबतच पदकांच्या तालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे.

 

10 मीटर एअर पिस्टलमध्ये 2 मेडल
जीतूने बनवले रेकॉर्ड...

- या कॅटेगरीत जीतू रायने स्टेज-1 मध्ये 49.7 आणि 100.4 चा स्कोअर केला.
- स्टेज-2 एलिमिनेशनमध्ये 235.1 चा स्कोअर केला. हा राक्ट्रकुल स्पर्धेतील रेकॉर्ड आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या केरी बेलने रौप्य जिंकले.


ओम 20 शॉट पर्यंत दुसऱ्या स्थानावर राहिला...
- ओम मिथारवलने स्टेज-1 मध्ये 49.0 आणि 98.1 चा स्कोअर केला.
- स्टेज-2 एलिमिनेशनमध्ये त्याने 214.3 चा स्कोअर केला.
- तो 20 शॉटपर्यंत दुसर्या क्रमांकावर राहिला. त्याचा स्कोअर 195.4 होता, तर केरीचा 165.3. परंतु, 21व्या शॉटमध्ये केरीने 10.2 चा स्कोअर केला. तर ओम 8.1 चाच स्कोअर करू शकला.

 

10 मीटर एअर रायफलमध्ये 2 पदकं....

- या कॅटेगरीत मेहूली घोषने रौप्य पदक पटकावले आहे. याच गटात अपूर्वी चंदेलाने कांस्य पदक आपल्या नावावर केले आहे. मेहुली आणि सिंगापूरच्या मार्टिना वेलोसो यांनी अंतिम फेरीत 247.2 अशा सारख्याच गुणांची कमाई केली होती. मात्र शूट ऑफमध्ये मार्टिनाने बाजी मारुन सुवर्ण पटकावले, तर अपूर्वीने 225.3 गुण मिळवून कांस्य मिळवले.


वेटलिफ्टिर प्रदीपने जिंकले रौप्य...
- प्रदीप सिंहने 105 किलोग्रॅम गटात 352 किलो वजन उचलले.
- या गटात समोआच्या सानेली माओने 360 किलो वजन उचलून गोल्ड जिंकले. 
- इंग्लँडच्या ओवन बोक्सआलच्या वाट्याला कांस्य पदक आले. 

 

पुढील स्लाइडवर पाहा विजेत्या खेळाडूंचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...