आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल 2018:35 दिवसांत 16 वर्षीय मनू सलग सहाव्यांदा चॅम्प; हिनाला राैप्यपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेल्ड काेस्ट- अायएसएसएफच्या वर्ल्डकपमधील दाेन सुवर्णपदक विजेती १६ वर्षीय नेमबाज मनू भाकर अाता ३५ दिवसांत सलग सहाव्यांदा चॅम्पियन ठरली. तिने रविवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतले. यामध्ये तीन सुवर्णपदक विजेती सर्वात युवा नेमबाज ठरली. तिचे महिनाभरामध्ये हे सहावे सुवर्णपदक ठरले. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात हे साेेनेरी यश संपादन केले. तिने याच गटात माजी नंबर वन हिना सिद्धूला मागे टाकून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. त्यामुळे हिनाला राैप्यवर समाधान मानावे लागले. रविकुमारने १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले. मनिका बत्राच्या नेतृत्वाखाली भारतीय टेबल टेनिस संघाने सुवर्णपदकाची कमाई केली.   


दुसरीकडे भारताची पहिल्याच दिवसापासून वेटलिफ्टिंगमध्ये सुरू असलेली पदकांची लय रविवारीही कायम राहिली. २२ वर्षीय पूनम यादवने महिलांच्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तिने ६९ किलाे वजन गटात हा पराक्रम गाजवला.

 

मनूला राष्ट्रकुलमधील विक्रमासह सुवर्णपदक
भारताच्या युवा नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये नव्या राष्ट्रकुल विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. तिने अापल्या गटात ३८८ गुणांसह राष्ट्रकुलचा विक्रमी क्वालिफाइंग स्काेअर नाेंदवला. त्यानंतर तिने फायनलमध्ये २४०.९ गुणांसह या स्पर्धेत नवा विक्रम नाेंदवताना सुवर्णपदक निश्चित केले. तिने ६.९ गुणांनी हिनावर अाघाडी घेत अव्वलस्थानी धडक मारली. त्यामुळे अनुभवी हिना दुसऱ्या स्थानावर राहिली.

 

विकास ठाकूरला कांस्य
भारताच्या विकास ठाकूरने ९४ किलाे वजन गटात कांस्यपदक पटकावले. त्याने एकण ३५१ किलाे वजनाचा भार उचलून तिसरे स्थान गाठले. त्याने स्नॅचमध्ये १५९ किलाे अाणि क्लीन-जर्कमध्ये १९२ किलाे वजन उचलले.  या गटात पापुअा न्यूगिनीचा स्टीव्हन ३७० किलाेसह अव्वल स्थानावर राहिला. कॅनडाच्या बाेंडीने (३६९ कि.) राैप्यपदक जिंकले.   

 

विकास ठाकूरला कांस्य
भारताच्या विकास ठाकूरने ९४ किलाे वजन गटात कांस्यपदक पटकावले. त्याने एकण ३५१ किलाे वजनाचा भार उचलून तिसरे स्थान गाठले. त्याने स्नॅचमध्ये १५९ किलाे अाणि क्लीन-जर्कमध्ये १९२ किलाे वजन उचलले.  या गटात पापुअा न्यूगिनीचा स्टीव्हन ३७० किलाेसह अव्वल स्थानावर राहिला. कॅनडाच्या बाेंडीने (३६९ कि.) राैप्यपदक जिंकले.   

 

 

वेट कॅटेगरी बदलून पूनम यादव ठरली चॅम्पियन 

ग्लासगाे राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य विजेत्या वेटलिफ्टर पूनम यादवने यंदा वेट कॅटेगरी बदलण्याचा निर्णय घेतला. तिने  ६९ किलाे वजन गटात काैशल्य पणास लावलेे. यात मेहनतीच्या बळावर तिने सुवर्णपदक जिंकले. तिने या गटात एकूण २२२ किलाे वजन उचलून वैयक्तिक सर्वाेत्तम कामगिरी नाेंदवली. तिने स्नॅचमध्ये १०० व क्लीन-जर्कमध्ये १२२ किलाेचा भार उचलला. 

 

सायना, श्रीकांतमुळे भारतीय बॅडमिंटन संघ फायनलमध्ये; अाज ‘सुवर्ण’ची माेठी संधी 
अाॅलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवाल अाणि के. श्रीकांतने उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर भारतीय संघाचा बॅडमिंटनच्या मिश्र गटातील फायनलमधील प्रवेश निश्चित केला. अाता भारतीय संघाला साेमवारी सुवर्णपदकाची संधी अाहे. टीमचा अंतिम सामना मलेशियाशी हाेईल. सायना अाणि के. श्रीकांतने संघाला उपांत्य सामन्यात सिंगापूरवर विजय मिळवून दिला. भारताने ३-१ अशा फरकाने अंतिम चारमधील सामना जिंकला. संघाच्या विजयात अश्विनी पाेनप्पासह सात्त्विकराज यांनीही माेलाचे याेगदान दिले.

 

भारतीय टेबल टेनिस संघाचे एेतिहासिक साेनेरी यश

मनिका बत्राच्या राेमहर्षक विजयाच्या बळावर भारतीय महिला टेबल टेनिस संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. भारताने अापल्या गटात सुवर्णपदक पटकावले. भारताचे राष्ट्रकुलच्या टेबल टेनिस प्रकारातील हे पहिलेच सुवर्ण ठरले. भारताच्या महिलांनी फायनलमध्ये सिंगापूरला ३-१ ने पराभूत केले. यासह टीम सुवर्णपदकाची मानकरी ठरली.  मनिका बत्रा, मधुरिका पाटकर अाणि माैमा दास यांनी सुरेख खेळीच्या बळावर भारतीय टेबल टेनिस संघाने हे यश संपादन केले.

 

> 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. वेटलिफ्टर पूनम यादवने सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. महिलांच्या 69 किलो वजनी गटात पूनमने सुवर्णमयी कामगिरी बजावली. पूनम यादवने 222 किलो वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने स्नॅचमध्ये 100 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये उचललं 122 किलो वजन उचललं.


> राष्ट्रकुल स्पर्धेत तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या आर.व्ही. राहुलने 85 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. आतापर्यंत स्पर्धेत भारताने 6 सुवर्णपदके जिंकली आहेत. यात 4 सुवर्ण एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. ही वेटलिफ्टिंगमधील भारताची गेल्या 46 वर्षांतील सर्वाेत्तम कामगिरी ठरली आहे. 44 वर्षांचा लिएंडर पेस डेव्हिस कपमध्ये सर्वाधिक 43 डबल्स सामने जिंकणारा खेळाडू ठरला अाहे.

 

हे ही वाचा
या स्पर्धेत आतापर्यंत यांनी जिंकले आहेत पदकं....

बातम्या आणखी आहेत...