आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद, नांदेड, अमरावती विद्यापीठांची विजयी सलामी;पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत मंगळवारी  औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, अमरावतीचे संत गाडगेबाबा विद्यापीठ व पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने  विजयी सलामी दिली. नांदेडने दोन सामने जिंकत या स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या स्पर्धेला माेठ्या उत्साहात सुरुवात झाली.    


अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने गुजरातच्या विद्यापीठावर ३-० असा विजय मिळवला. यात जशांत मेश्राम, शशांक रुखाने व कुणालेने विजय मिळवून दिले. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने राजकोटच्या सौराष्ट्र विद्यापीठास ३-० असे नमवले.     


यजमान साेलापूर पराभूत :  यजमान सोलापूर विद्यापीठाला सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले.  जयपूरच्या मणिपाल विद्यापीठाने या टीमला पराभूत केले. 

 

अाैरंगाबादच्या विद्यापीठ संघाची नागपूरवर मात 
अाैरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठाने सलामीला नागपूरच्या महाराष्ट्र ए अँड एफ सायन्स विद्यापीठाचा ३-१ असा पराभव केला. यात शैलेश बेंडसुरे व प्रसाद बुरांडेने बाजी मारली. नागपूरकडून नितीन ढोरेने कडव्या लढतीत रौनक बेंडसुरेवर ३-२ अशी मात केली.   

 

बातम्या आणखी आहेत...