आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाजीचा वर्ल्ड कप: शहजार रिझवी पदार्पणात विक्रमासह ठरला वर्ल्ड चॅम्पियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवादालाजारा-  भारताच्या शहजार रिझवीने अायएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत साेनेरी यशाचा डबल धमाका उडवला. त्याने रविवारी पदार्पणातील वर्ल्डकपमध्ये विश्वविक्रमी गुणांची कमाई करताना सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये हे एेतिहासिक यश संपादन केले.

 

भारताच्या युवा नेमबाज रिझवीने २४३.३ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. या गटात भारताच्या जितू राॅयला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रिझवीने फायनलमध्ये जर्मनीच्या क्रिस्टियन रिट्जला पिछाडीवर टाकून अव्वल स्थान गाठले. त तसेच या गटात भारताच्या अाेमप्रकाशने चाैथे स्थान गाठले. रविवारपासून मेक्सिकाेत अायएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेेला सुरुवात झाली.

 

मेरठच्या शहजार रिझवीला बालपणापासून गुल्लरीने निशाणा लावण्याचा छंद हाेता. यातूनच त्याने यामध्ये सरावातून खास प्राविण्य संपादन केले. दरम्यान शहरातील एका महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. याच ठिकाणी त्याची महाविद्यालयातील एनसीसी शिबिरासाठी निवड झाली. या शिबिरात त्याला प्रथमच बंदुकीने नेम साधण्याची संधी मिळाली. यामध्ये  त्याने अचुक असा नेम साधला. त्यामुळे शिबिराच्या अधिकाऱ्यांचे त्याने या कामगिरीतून लक्ष वेधले. त्यानंतर त्याला या अधिकाऱ्यांनी खास मार्गदर्शन केले अाणि मग त्याला नेमबाजीसाठी अकादमीमध्ये सहभागी हाेण्याचा सल्ला देण्यात अाला.  दरम्यान त्याने तंत्रशुद्ध पद्धतीने नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले.

 

भारताच्या तिघांची अंतिम फेरीत धडक

पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये भारताच्या नेमबाजांनी सुरेख कामगिरी केली. त्यामुळे शहजार रिझवीसह जितू राॅय अाणि अाेमप्रकाशने अंतिम फेरीचा पल्ला यशस्वीपणे गाठला. मात्र, फायनलमध्ये अाेमप्रकाशला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्यामुळे ताे चाैथ्या स्थानावर राहिला. त्याने अंतिम फेरीत १९८.४ गुण संपादन केले. त्यामुळे या गटात तीन पदके जिंकण्याचा भारताचा प्रयत्न अपुरा ठरला. यामुळे भारतीय संघाला या गटात केवळ दाेनच पदकाची कमाई करता अाली नाही.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, मेहुली घाेषला कांस्यपदक...

बातम्या आणखी आहेत...