Home | Sports | Other Sports | World Cup shooting: Rizvi finished second in the 10m air pistol category

विश्वचषक नेमबाजी : रिझवीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात गाठले दुसरे स्थान

वृत्तसंस्था | Update - Apr 25, 2018, 02:44 AM IST

भारताचा अनुभवी खेळाडू शहजार रिझवीने मंगळवारी अायएसएसएफच्या नेमबाजी विश्वचषकात राैप्यपदकाची कमाई केली. यासह त्याने भारता

  • World Cup shooting: Rizvi finished second in the 10m air pistol category

    चांगवाेन (द. काेरिया) - भारताचा अनुभवी खेळाडू शहजार रिझवीने मंगळवारी अायएसएसएफच्या नेमबाजी विश्वचषकात राैप्यपदकाची कमाई केली. यासह त्याने भारताला या स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये दुसरे स्थान गाठले. त्याने २३९.८ गुणांसह राैप्यपदक अापल्या नावे केले. अवघ्या ०.२ गुणांनी पिछाडीवर राहिल्याने त्याचे सुवर्णपदक हुकले.


    भारताच्या २३ वर्षीय रिझवीचे दीड महिन्यात हे दुसरे पदक ठरले. त्यानेे गत महिन्यात (४ मार्च) मेक्सिकाे येथील विश्वचषकात सुवर्णपदक जिंकले हाेते. या ठिकाणी त्याने विश्वविक्रमी गुणांसह साेनरी यशाची कमाई केली. अाता दक्षिण काेरियातील वर्ल्डकपमध्ये त्याला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले.


    अाता काेरियातील स्पर्धेत भारताच्या युवांना पदकाची संधी अाहे. अद्याप सात प्रकारच्या फायनल्स हाेणार अाहेत. यातील सरस कामगिरीने भारतीय संघाचा पदकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी अाता दिग्गज नेमबाजांवर संघाची मदार असेल. मंगळवारी अाॅलिम्पियन जितू अाणि युवा नेमबाज अाेमप्रकाश हे दाेघेही अपयशी ठरले.


    एकूण २३९.८ गुणांसह दुसऱ्या स्थानी : विश्वविक्रमवीर नेमबाज रिझवीने अापल्या गटाच्या फायनलमध्ये सरस कामगिरी केली. त्याने २३९.८ गुणांची कमाई करताना राैप्यपदक निश्चित केले. त्याची २४ शाॅटच्या फायनलमध्ये ही चांगली कामगिरी राहिली. केवळ ०.२ गुणांच्या पिछाडीमुळे त्याला सुवर्णपदकाचा वेध घेता अाला नाही. या गटात रशियाच्या अार्टेम चेर्नाेसाेवने सुवर्णपदक पटकावले. त्याने २४०.० गुणांसह अव्वल स्थान गाठले. तसेच बल्गेरियाचा सॅम्युअल हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

Trending